ठाणे : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधूंसह एकाची निर्घृण हत्या करणा-या 47 आरोपींना ठाणे कोर्टाने आज, सोमवारी जामीन मंजूर केला. यापू...
ठाणे : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधूंसह एकाची निर्घृण हत्या करणा-या 47 आरोपींना ठाणे कोर्टाने आज, सोमवारी जामीन मंजूर केला. यापूर्वी ठाणे कोर्टाने 53 आरोपींना जामीन दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 163 आरोपींना अटक केली होती.
गेल्या 16 एप्रिल रोजी पालघरच्या सीमावर्ती भागामध्ये गुजरातकडे जाणार्या दोघा साधूंना आणि त्यांच्या वाहन चालकाची जमावाने निर्घृण हत्या केली होती. लहान मुले पळवणारे गुन्हेगार असल्याचे समजून या साधूंची आणि वाहन चालकांची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. त्यामुळे हे प्रकरण देशभरात गाजले. पोलिसांनी यासंदर्भात 163 आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी 4955 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 12 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली होती. तर या प्रकरणातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या आरोपीच्या संपर्कात आलेल्या 43 जणांना आता क्वॉरंटाईन करण्यात आले होते. दरम्यान ठाणे कोर्टाने या प्रकरणातील 53 आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर केला.