परळी । प्रतिनिधीः- परळी शहरातून अतिरिक्त राखेची वाहतूक होत असल्याने याचा त्रास शहरवासियांना होत असल्याने काल ग्रामीण पोलिसांनी पाच हायवा वर ...
परळी । प्रतिनिधीः-
परळी शहरातून अतिरिक्त राखेची वाहतूक होत असल्याने याचा त्रास शहरवासियांना होत असल्याने काल ग्रामीण पोलिसांनी पाच हायवा वर कारवाई केल्यानंतर आज शहर पोलिसांनी पाच गाड्यांवर कारवाई करत त्यांना दंड आकारला आहे.गेल्या काही महिन्यापासून राखेच्या वाहतुकी विषयी अनेक तक्रारी होत्या उघड्या ने वाहतूक होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता .
गेल्या अनेक दिवसांपासून हायवा गाडीद्वारे राखेची वाहतूक केली जाते. चालक मर्यादेपेक्षा जास्त राख गाडीमध्ये भरत असल्याने ही राख रस्त्याने उडते अन् त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याने यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा अतिरिक्त राख घेऊन जाणार्या वाहन धारकांवर कालपासून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. काल पाच गाड्यांवर कारवाई केल्यानंतर आज पुन्हा पाच गाड्यांवर कारवाई करून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.राखेची वाहतूक करताना वाहनांना वरीं ताडपत्रीचे आवरण असणे गरजेचे आहे पण तसे होत नसल्याने सर्व शहरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्याने प्रशासनाने हि कारवाई केली आहे .