अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्याती करमाळा तालुक्यात या बिबट्याचा उपद्रव सुरू होता. या भागात ...
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्याती करमाळा तालुक्यात या बिबट्याचा उपद्रव सुरू होता. या भागात त्याने 8 जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबटयाला ठार मारण्यात वनविभागाला यश आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत वन विभागाचे शार्प शूटर डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्याला टिपले. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू होती. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्याती करमाळा तालुक्यात या बिबट्याचा उपद्रव सुरू होता. या भागात त्याने 8 जणांचे बळी घेतले होते. एकट्या करमाळा तालुक्यातच तीन बळी घेतले होते. पिंजरे लावूनही तो सापडत नव्हता. उलट माणसांवर आणि प्राण्यांवर त्याचे हल्ले सुरूच होते. त्यामुळे त्याला पकडण्याचा आणि नाहीच सापडला तर ठार करण्याचा आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी 5 एकर ऊस पेटवून देण्यात आला होता. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले. काही दिवसांपासून बिबट्याचा सोलापूर जिल्ह्यात धुमाकुळ सुरु होता. यानंतर तो कोणालाही दिसलाच नव्हता, वनविभाग मागावर होते. नंतर तब्बल 9 दिवसांनंतर करमाळा तालुक्यातील उंदरगावात बिबट्याचे दर्शन झाले होते. गेल्या 7 डिसेंबर रोजी केडगाव शिवारात ऊसतोड मजुराची सात वर्षीय अल्पवयीन मुलगी फुलाबाई कोठले हिचा जीव घेतल्यानंतर बिबट्या आढळून आला नव्हता. वनविभागाकडून त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आतापर्यंत बिबट्या तीन वेळा गोळीबारातून निसटला होता. अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरूनही तो अद्याप सापडला नव्हता. बिटरगाव व भिवरवाडी भागात त्याचे अस्तित्व असल्याची चर्चा होती. वनविभागाने त्याद़ृष्टीने सापळा रचला असताना या बिबट्याने चकवा दिला होता. उंदरगाव येथे बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रथम दत्ता रंदवे यांना व अर्धा तासाच्या अंतराने सरपंच हनुमंत नाळे यांना नाळे वस्ती येथील शंकर कांबळे यांच्या उसाजवळ बिबट्या दिसला होता. अखेर आज हा बिबट्याला मारण्यात वनविभागाला मारण्यात यश आले आहे.