$type=ticker$snippet=hide$cate=0

सुप्यात 91 बांगला देशी नागरिक!

  अहमदनगर / प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील सुपे ग्रामपंचायत हद्दीतमध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे 91 बांगला देशी व परप्रांतीय नागरिकांची नावे ...

 


अहमदनगर / प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील सुपे ग्रामपंचायत हद्दीतमध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे 91 बांगला देशी व परप्रांतीय नागरिकांची नावे सामाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. तसे निवेदनही मनसेने जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना दिले. ही 91 नावे वगळण्यात यावी, अन्यथा आपल्या दालनात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला आहे.


मनसेच्या निवेदनामुळे मतदार यादीतील नावाबाबत शंका उपस्थित झाली आहे. मतदार यादीत असणारे संबंधित 91 मतदार हे मोकळ्या जागेत झोपडपट्टी बांधून राहात आहेत. त्यांचे दर सहा महिन्यांनी स्थलांतर होत असते. या सर्वांना राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड मिळालेले आहे. त्या आधारावर सुपा-वाळवणे रस्त्यालगत गट नंबर 42 मध्ये हे सर्व कच्च्या स्वरूपाचे पाल-तंबू असा निवारा करून राहत आहेत. याबाबत ग्रामविकास अधिकार्‍यांनी पाहणी करून अहवाल सादर केला आहे. मतदार यादीत ही नावे बोगस असल्याचे निष्पन्न झाले, असे अहवालात म्हटले होते. 

पंचायत समितीच्या सभापतींना याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे. तरीही ही नावे वगळण्यात आली नाहीत, असेही मनसेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन मतदार नोंदणी करता 15 वर्ष रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो. तसा पुरावा या नाव नोंदणीत नाही, हे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. कुठल्या आधारावर ही नावनोंदणी झाली, असा प्रश्‍न उपस्थित झाला असून याबाबत अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यानंतरसुद्धा ही नावे मतदान यादीतून वगळली नाहीत.

पारनेर तालुक्यातील सुपे ग्रामपंचायत हद्दीतील यादी भाग नंबर 267 व 268 मध्ये आलेली 91 बोगस नावे रद्द करावी, या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बोगस नावे असणार्‍या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणीही मनसेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आपल्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. डफळ, भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, अविनाश पवार, नितीन म्हस्के, उपजिल्हाध्यक्ष मारुती रोहकले यांच्यासह मनसे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9976,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4147,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15362,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12459,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3442,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सुप्यात 91 बांगला देशी नागरिक!
सुप्यात 91 बांगला देशी नागरिक!
https://akm-img-a-in.tosshub.com/indiatoday/images/story/202001/MNS008_1200x675.jpeg?ikrKn8PBS_74XMlx5xOTYHblLu.i27b.&size=1200:675
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/91.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/91.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content