अनुराग कश्यप आणि अनिल कपूरचा आगामी 'AK vs AK' या मॉक्यूमेन्ट्री ड्रामाचा ट्रेलर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटातील काही दृ...
अनुराग कश्यप आणि अनिल कपूरचा आगामी 'AK vs AK' या मॉक्यूमेन्ट्री ड्रामाचा ट्रेलर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटातील काही दृष्यांवर भारतीय हवाई दलाने आक्षेप घेतले आहेत.
मुंबई: भारतीय हवाई दलाने एक ट्वीट करुन AK vs AK या चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृष्ये वगळावीत असं नेटफ्लिक्सला सांगितलंय. हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूर हवाई दलाला चुकीच्या पध्दतीने रंगवतोय असा आक्षेप घेत यातील काही आक्षेपार्ह दृष्य वगळावीत असं सांगितलं आहे.या ट्रेलरमध्ये हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूरने वापरलेली भाषा ही अर्वाच्य असून ती भारतीय हवाई दलाच्या नियमांचं उल्लंघन करते अशाही प्रकारचा आक्षेप हवाई दलानं घेतलाय.