$type=ticker$snippet=hide$cate=0

पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल

आषाढी यात्रेला सर्वच संतांच्या पादुका श्री. विठ्ठल भेटीला येत असतात. पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळयासाठी आज पंढरपु...

आषाढी यात्रेला सर्वच संतांच्या पादुका श्री. विठ्ठल भेटीला येत असतात.


पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळयासाठी आज पंढरपुरातून साक्षात श्री. विठ्ठलाने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री विठ्ठला समवेत भक्त पुंडलिक आणि संत नामदेव यांच्याही पादुकांचे प्रस्थान आळंदीकडे झाले. आषाढी यात्रेला सर्वच संतांच्या पादुका श्री. विठ्ठल भेटीला येत असतात.मात्र कार्तिक वैद्य एकादशी आणि त्यानंतर होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी साक्षात श्री विठूराया उपस्थित होते, असा संत नामदेवराय यांच्या अभंगात उल्लेख आहे. त्यामुळे प्रतिवर्षी श्री विठ्ठलाच्या पादुका संजीवन समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान करत असतात. एसटी महामंडळाच्या फुलांनी आकर्षकपणे सजवलेल्या बसमधून 20 वारकऱ्यांसह श्री. विठ्ठलाच्या पादुकांचे आज सकाळी 9 वाजता प्रस्थान झाले. सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पादुकाची मंदिर समितीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली. त्यानंतर विठू नामाच्या जयघोषात पादुकांनी बसमधून प्रस्थान केले. या बरोबरच संत नामदेव आणि भक्त पुंडलिक यांच्याही पादुका आज एसटी बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. यावर्षी कोरोना संकटामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रतिकात्मक पध्दतीने सोहळे साजरे केले जात आहेत. त्यामुळे शासन नियमानुसार आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या 20 वारकऱ्यांसह विठ्ठलाच्या पादुका फुलांनी सजवलेल्या बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. संजीवन समाधीला आळंदीत सुरुवात आळंदीत 724 व्या संजीवन समाधीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येत्या 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माथा टेकवायला येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि मंदिर प्रशासनाने संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10048,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15563,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12674,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल
पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल
https://1.bp.blogspot.com/proxy/hjGzrR_pcZJByd1qy7_tR9VFFoj5h3bR-Twww4DQYKLjYt-R4y96N0GqjHb5VoXUv7iKhi4ssXylQYRFd6zcr5vLQs4=w426-h320
https://1.bp.blogspot.com/proxy/hjGzrR_pcZJByd1qy7_tR9VFFoj5h3bR-Twww4DQYKLjYt-R4y96N0GqjHb5VoXUv7iKhi4ssXylQYRFd6zcr5vLQs4=s72-w426-c-h320
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_101.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_101.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content