शिराळा / प्रतिनिधी : आरळा, ता. शिराळा येथील बाजार पेठेत मोटर सायकलवरुन आलेल्या दोघांनी एकास पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करुन जखमी केल्याची...
शिराळा / प्रतिनिधी : आरळा, ता. शिराळा येथील बाजार पेठेत मोटर सायकलवरुन आलेल्या दोघांनी एकास पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करुन जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली असून, याबाबतचा गुन्हा कोकरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोकरुड पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विष्णू नामदेव पाटील (वय 45, रा. शितूर, वारुण. ता. शाहुवाडी) हे आरळा येथील बाजारपेठत असलेल्या त्यांच्या पुतण्यांच्या दुकानासमोर उभे असताना पाठीमागून मोटर सायकलवरुन आलेल्या लक्ष्मण राजू माने (रा. नबी, ता. पाटण) व भिवा राजू सोनावणे (रा. चांदोली वसाहत आरळा) या दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ करत खाली पडून मारहाण केली. यात लक्ष्मण माने याने पिस्तूल सारख्या लोखंडी वस्तूने विष्णु पाटीलांच्या डोक्यावर, मानेवर हल्ला करत मारहाण केल्याची तक्रार कोकरुड पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास कोकरुड पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वाघ हे करत आहेत.