$type=ticker$snippet=hide$cate=0

नियुक्तीपासून शाळेवर गैरहजर राहणार्‍या शिक्षिकावर कारवाई करा

जिल्हा परिषद कृषी सभापती सविता बाळासाहेब मस्के यांची शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार गेवराई । प्रतिनिधीः- गेवराई तालुक्यातील सावळेश्वर शाळेवर नि...


जिल्हा परिषद कृषी सभापती सविता बाळासाहेब मस्के यांची शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार

गेवराई । प्रतिनिधीः-

गेवराई तालुक्यातील सावळेश्वर शाळेवर नियुक्ती होऊन वर्ष उलटले तरी शिक्षिका कायम गैरहजर राहत आहे. याबाबत ग्रामस्थांची ओरड असल्याने या गटाच्या सदस्या तथा बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण सभापती यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. दरम्यान या तक्रारीची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली असून गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी चौकशी नियुक्त अधिकार्‍यांनी गावात जाऊन चौकशी केली असून हा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधीत गैरहजर राहणार्‍या शिक्षिकेवर शिक्षणाधिकारी कारवाई करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

   गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव वसाहत केंद्रांतर्गत सावळेश्वर जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेवर गतवर्षी प्रतिनियुक्तीवर श्रीमती सुरेखा वडमारे या शिक्षिकेची नियुक्ती शिक्षण विभागाकडून झाली आहे. मात्र नियुक्तीनंतर वडमारे या शाळेवर कायम गैरहजर राहत आहेत. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली, तरी सदरील शिक्षिका शाळेवर हजर राहत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामस्थांनी तक्रार करुनही शिक्षिका वडमारे या गैरहजर राहत असल्याने त्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बाबत ग्रामस्थांनी सतत ओरड असल्याने या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा बीड जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण सभापती यांच्याकडे लेखी तक्रार करुन शाळेवर गैरहजर राहणार्‍या वडमारे या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान या तक्रारीची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी गेवराईचे गटशिक्षणाधिकारी मिलिंद तुरुकमारे यांना पत्र पाठवून सदरील शिक्षिकेची चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनी तीन सदस्यीय पथक नियुक्त केले. त्यानुसार या पथकाने गावात जाऊन चौकशी करत ग्रामस्थांचे जवाब नोंदवून अहवाल गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केला आहे. हा अहवाल आता शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून सदरील शिक्षकेवर कारवाई होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

----------

 सावळेश्वर येथील शाळेवरील शिक्षक हजेरी पत्रक हस्तगत केले आहे. यामध्ये नियुक्तीपासून वडमारे या शिक्षिका शाळेवर सतत गैरहजर दिसत आहेत, हि बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणी कारवाई होणे आवश्यक आहे.

सविताताई मस्के,सभापती, जिल्हा परिषद बीड

-------

तीन सदस्यीय समितीने गावात जाऊन चौकशी करत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून तेच पुढील कारवाई करतील.

मिलिंद तुरुकमारे,गटशिक्षणाधिकारी, गेवराई

----------

Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15277,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12359,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नियुक्तीपासून शाळेवर गैरहजर राहणार्‍या शिक्षिकावर कारवाई करा
नियुक्तीपासून शाळेवर गैरहजर राहणार्‍या शिक्षिकावर कारवाई करा
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_105.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_105.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content