माजलगाव । प्रतिनिधीः- तालुक्यातील मंजरथ गावच्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांचे हाल होत आहे...
माजलगाव । प्रतिनिधीः-
तालुक्यातील मंजरथ गावच्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत तर माजलगाव ला येणे ही मुश्किल बनले असून ग्रामस्थांना अनेक अडचणीला सामोरे जावालागत असून हा रस्ता दुरुस्त करावे नसता सा.बा. कार्यालय वर पालक विद्यार्थी तिवृ आंदोलन करतील असे निवेदन येथील बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाते असलेल्या मंजरथ गाव हे सरता नसल्याने आडगळीस पडले आहे या गावा पासून माजलगाव दहा कि.मी. अंतर आहे परंतु रस्तावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने बस सेवा ही बंद असून दळणवळण सेवाच बंद असल्याने मंजरथ येथे शिक्षणासाठी व माजलगाव ला शिक्षणासाठी ये-जा करणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी सा. बा. विभागाने 29 डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्त करावे असे निवेदन बांधकाम विभागाला दिले असुन या निवेदनावर,डासाळकर दिग्विजय,चुंबने नितीन,कांडुरे विलास,पराग किरण,कॉ.सुभाष थोरात, शिवाजी राऊत,सुमंत देशमुख,पाडमुख संदिपान बोटे भगवान साखरे रणवीर,हाणुमान यादव,केशव दिक्षीत,खुणे अरुण,काठवठे ओंकार सह शंभर जणांच्या सह्या असून यांनी आंदोलन चा इशारा दिला आहे.