$type=ticker$snippet=hide$cate=0

यात्रा-जत्रा रद्द करण्याकडे प्रशासनाचा कल असताना पुसेगावमध्ये रथ यात्रेची दमदार तयारी

  ओम नमो नारायण’ जयघोषाने सेवागिरी मंदिर दुमदुमले; प. पू. सेवागिरी महाराजांच्या रथयात्रेसाठी नवीन रथ पुसेगाव / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श...

 

ओम नमो नारायण’ जयघोषाने सेवागिरी मंदिर दुमदुमले; प. पू. सेवागिरी महाराजांच्या रथयात्रेसाठी नवीन रथ

पुसेगाव / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता लॉकडाऊनमधून काही गोष्टींना सुट देण्यास सुरुवात झाली असताना गावा-गावातील यात्रा-जत्रा रद्द करण्याचा धडका प्रशासनाने लावला आहे. अशा स्थितीत पुसेगाव येथे प. पू. सेवागिरी महाराजांच्या  रथयात्रेची जोरदार तयारी सुुरु असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच मंत्रांचा जयघोष करत आणि श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या नूतन रथाचे विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी सद्गुरु सेवागिरी महाराज की जय’... ओम नमो नारायण’... जयघोषाने सेवागिरी मंदिर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला. रथाच्या पूजनासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते.

जगभर कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरु झाले आहे. त्यातील टप्प्या-टप्प्यांनी बंद असलेल्या बाबी सुरु करण्यात येत आहेत. मात्र, अनलॉकमधून जरी सुट देण्यास सुरुवात केली असली तरी यात्रा-जत्रांसह सार्वजनिक कार्यक्रमांवर आजूनही बंदी कायम आहे. अशा स्थितीत खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे प. पू. सेवागिरी महाराजांच्या यात्रेची तयारी जोरदार सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा होण्यामागील कारण म्हणजे ट्रस्टने रथयात्रेसाठी नवीन बनविलेला रथ होय. यात्रा-जत्रांवर प्रशासन बंदी घालत संबंधित गावासह मंदिर परिसरात संचार बंदी लागू करत असल्याचे म्हसवड यात्रेतील उदाहरण समोर आहे. अशा स्थितीत पुसेगाव मध्ये रथयात्रेची तयारी जोरदार सुरु असल्याने प्रशासनाच्या निर्णयाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवीन रथ बानगे (जि. कोल्हापूर) येथील कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केला आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. श्री सेवागिरी महाराज रथोत्सवादिवशी रथ गावातून फिरविण्यात येतो.

विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नवीन रथाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्‍वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब कचरे, प्रकाश जाधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शशिकांत शिंदे म्हणाले, सेवागिरी महाराजांनी मानवतेचा संदेश दिला. सेवाभाव हीच त्यांची खरी शिकवण होती. मानवता हाच धर्म त्यांनी जोपासला. त्यांचे विचार व शिकवण आत्मसात करण्याची गरज आहे. चेअरमन मोहनराव जाधव यांनी रथ पूजनासाठी उपस्थित भाविकांचे आभार मानले. दरम्यान, विश्‍वस्त सुरेशशेठ जाधव यांनी रथावरील सिंहासनासाठी सव्वासहा किलो चांदी अर्पण केली. या रथाच्या निर्मितीसाठी बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब जाधव यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिली आहे. यावेळी मंदिरात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4133,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15279,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12360,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3421,विदेश,635,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: यात्रा-जत्रा रद्द करण्याकडे प्रशासनाचा कल असताना पुसेगावमध्ये रथ यात्रेची दमदार तयारी
यात्रा-जत्रा रद्द करण्याकडे प्रशासनाचा कल असताना पुसेगावमध्ये रथ यात्रेची दमदार तयारी
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_109.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_109.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content