$type=ticker$snippet=hide$cate=0

पुण्यात मिळेनात भाडेकरू ’वर्क फ्रॉम होम’ चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका

पुणे / प्रतिनिधीः माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना वर्क फ्रॉम होम असल्याने देशभरातून नोकरीसाठी आलेले कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. खासगी कंपनीतील...



पुणे / प्रतिनिधीः माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना वर्क फ्रॉम होम असल्याने देशभरातून नोकरीसाठी आलेले कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. खासगी कंपनीतील 80 टक्के कर्मचारी भाड्याने राहतात. वर्क फ्रॉम होम असल्याने कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. त्यांनी भाड्यांची घरे सोडली आहेत. त्यामुळे शहरातील घर मालकांना भाडेकरू मिळत नाहीत. 

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हिंजवडी भागात आयटी कंपन्या आल्यामुळे शहरात देशभरातून चाकरमानी रोजगारासाठी आले. कोरोनामुळे जवळपास नऊ महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. याचा मोठा आर्थिक फटका या भागातील उद्योगांवर झाला आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी आपल्या मूळ गावातून काम करत आहेत. कोरोनाच्यापूर्वी हिंजवडी आणि परिसरात भाड्याने फ्लॅट मिळणे कठीण होते. मागणी जास्त असल्याने भाडेदेखील वाढले होते. कोरोनामुळे शहरातील बहुतांश फ्लॅट रिकामे झाले आहेत. त्यामुळे आता भाडे कमी झाले आहेत. हिंजवडी भागात अनेकांनी उत्पन्न मिळावे म्हणून फ्लॅट भाड्याने देणे, हॉस्टेल, रूम भाड्याने देणे आदी व्यवसाय कर्ज काढून सुरू केले आहेत; परंतु सध्या भाडेकरू नसल्याने या लोकांचे उत्पन्न थांबले आहे. सर्वच नामांकित कंपन्यांनी कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक लागणारे साहित्य दिले. पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता आहे.

खासगी क्षेत्रात काम करणारे बहुतांश कर्मचारी हे शहरातून निघून गेल्याने सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट, हॉटेल, खासगी कार वाहतूक, हिंजवडी भागातील लहान व्यवसाय, खानावळी आदी व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्वी ज्या सदनिकांना 12 हजार रुपये भाडे होते, ते आता आठ-नऊ हजारांवर आले आहे. 15 ते 17 हजार रुपये भाडे असलेल्या सदनिका आता 12 हजार रुपये भाड्यांत अगदी सहज मिळतात. हिंजवडी भागातील होस्टेल्स सध्या रिकामी आहेत. रिअल इस्टेट व्यवसायाला याचा फटका बसला आहे.

Name

] ब्रेकिंग,850,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5545,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,2,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9969,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4146,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15353,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12448,महाराष्ट्र सातारा,22,मुंबई,3441,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3155,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुण्यात मिळेनात भाडेकरू ’वर्क फ्रॉम होम’ चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका
पुण्यात मिळेनात भाडेकरू ’वर्क फ्रॉम होम’ चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/1200x900/work-from-home-offce-000_202012531633.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_111.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_111.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content