मेलबर्न : भारताने पहिल्या कसोटीतील पराभव नंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करत 8 विकेट्सने मात दिली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क...
मेलबर्न :
भारताने पहिल्या कसोटीतील पराभव नंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करत 8 विकेट्सने मात दिली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या कसोटी सामन्यामध्ये चारही दिवस भारताने गाजवले. त्यामुळे चार दिवसातल्या एकाही सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाला स्वतःच्या भूमीत उजवी कामगिरी करु दिली नाही हे विशेष. भारताचा नियमित कर्णधार असलेला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राच्या मराठामोळ्या अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाने नमवलं आहे. साहजिकच अजिंक्य रहाणेवर दिग्गज खेळाडू कौतुकाचा वर्षाव करत आहेत. विराट कोहलीनेही भारतीय संघाचं अभिनंदन करत अजिंक्यचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघं 70 धावांचं लक्ष दिलं होतं. भारताने हे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करुन ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर विराटने ट्विट करत म्हटलंय, “भारतीय टीमने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि विजय मिळवला. भारतीय खेळाडू आणि खासकरून अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल मला विशेष आनंद आहे. यानंतर भारतीय संघाची कामगिरी अधिक सरस असेल”
कर्णधार अजिंक्य रहाणेंचं झुंजार शतक, रविंद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी आणि टीम इंडियाच्या बोलर्सची टिच्चून गोलंदाजीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कांगारुंना आठ विकेट्सने नमवून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. अजिंक्यच्या मॅचविनिंग खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला.