बुलडाणा : जिल्ह्यातंर्गत भारतीय कपास निगम (सिसीआय) मार्फत चिखली, मलकापूर, नांदुरा व खामगांव तसेच कापूस पणन महासंघ (फेडरेशन) मार्फत देऊळगां...
बुलडाणा : जिल्ह्यातंर्गत भारतीय कपास निगम (सिसीआय) मार्फत चिखली, मलकापूर, नांदुरा व खामगांव तसेच कापूस पणन महासंघ (फेडरेशन) मार्फत देऊळगांव राजा, शेगांव, जळगांव जामोद येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर संबंधीत यंत्रणेकडून कापूस खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीसाठी 32 हजार 875 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. आजपर्यंत 2930 एवढ्या शेतकऱ्यांचा 1 लक्ष 5 हजार 56 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र काही खरेदी केंद्रावर शेतकरी ऑनलाईन नोंदणी न करता परस्पर कापूस विक्रीला आणत असल्याचे निर्दशनास आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीकडून संदेश न येता कापूस विक्रीसाठी आणला, त्यांचा कापूस खरेदी केल्या जाणार नाही. कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून ती कापूस विक्रीस इच्छूक शेतकऱ्यांनी करावी.
ऑनलाईन नोंदणी न करता कापूस विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांमुळे संबंधीत यंत्रणेला धोरणाप्रमाणे कापूस खरेदी करता येत नाही. परिणामी असे शेतकरी त्यांच्या गाड्या रस्त्यावर आणून सार्वजनिक वाहतूकीस अडथळा आणत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची अडचण निर्माण होत आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यांना संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समितीकडून ऑनलाईन संदेश प्राप्त होतो. अशा शेतकऱ्यांनीच खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ महेंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.