जेसीबी, ट्रॅक्टरसह मोठा वाळूसाठा जप्त ; काही वाहने पळून जाण्यात यशस्वी पारनेर/प्रतिनिधीः पारनेर तालुक्यातील पवळ दरा पोखरी येथील मुळा नदी ...
जेसीबी, ट्रॅक्टरसह मोठा वाळूसाठा जप्त ; काही वाहने पळून जाण्यात यशस्वी
पारनेर/प्रतिनिधीः पारनेर तालुक्यातील पवळ दरा पोखरी येथील मुळा नदी पात्रात जवळ जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने वाळू उत्खनन विना परवाना करत असणार्यांवर पारनेर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल बावीस ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून एकूण 4,47,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील मुळा नदीच्या पात्राजवळ गट नंबर 432 पैकी पवळ दरा पोखरी तालुका पारनेर विनापरवाना उत्खनन करून वाळू साठा केला जात आहे. याबाबतची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पारनेर पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकाने तेथे जात कारवाई केली. यावेळी आरोपी संगमनेर तालुक्यातील जांबुत येथील राजु डोंगरे, संगमनेर तालुक्यातील मोरवाडी येथील सुरेश सुदाम मोरे व त्याच्या दोन साथीदारांवर पोलिसांनी कारवाई केली. हे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध वाळू उत्खनन करून चोरी करून त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरता अंदाजे 22 ब्रास वाळू साठा केला असल्याचे पथकाच्या लक्षात आले. दरम्यान काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाले. कारवाई केलेल्या वाहनांमध्ये 3,55,000 जुना वापरत असलेली लाल रंगाचा महिंद्रा युवो 575 डी आय कंपनी ट्रॅक्टर विना नंबरची लाल रंगाची दोन चाकी जुनी वापरती ट्रॉली 92,400 तसेच 22 ब्रास उत्खनन केलेला वाळूसाठा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद तलाठी शरदचंद्र गोरक्षनाथ नागरे, वय 42 यांनी दिली आहे. यावरून पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.
पारनेर तालुक्यात अवैध धंदे तेजीत
पारनेर तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय फोफावत असून, त्यात वाळू तस्करी मोठया प्रमाणात होत आहे. ते रोखण्यात पोलिस यंत्रणा अपुरी पडते का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच या कारवाईमध्ये काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाले की, अजून यात कोणाचे अर्थपूर्ण संबध आहेत, याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच या कारवाईत काही वाहने पळून गेली की, कुणाच्या वरदहस्तामुळे पळून गेली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
------------------------------