बूलडाणा/ प्रतिनिधि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या अभद्र वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात,तसेच अभद्र वक्तव्य दानवे यांनी दिल्...
बूलडाणा/ प्रतिनिधि
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या अभद्र वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात,तसेच अभद्र वक्तव्य दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केला आहे. दानवे यांनी दिल्लीतील या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे अभद्र वक्तव्य केले आहे.शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रू राष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन असल्याचे संतप्त शिवसैनिकांनी सांगीतले आहे, यापूर्वीही
दानवे यांनी शेतकऱ्यां बद्दल (साले रडतात)असे निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते. दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. हेच दानवे जेव्हा आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वक्तव्य करतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांची तीच विचारसरणी पुढे येत आहे. यापुढे दानवे यांना आम्ही राजकीय विरोधक म्हणून काही उत्तर देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकच त्यांना योग्य ते उत्तर देतील. अशा लोकांचे वक्तव्य जास्त कोणीही फारसे मनाला लावून घेऊ नये, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मात्र ते असेच पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही.तसेच पंतप्रधान यांनी रावसाहेब दानवे यांचा राजीनामा मागावा कारण नेहमीच ते शेतकरी विरोधात वक्तव्य करत असतात.असे वक्तव्य करणाऱ्या दानवे यांचा निषेध करुन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना विषयी ही वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे चा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी केली. गेल्या बारा महिन्यापासून पेट्रोल डिझेलची वाढ होत असून सामान्य जनता त्रस्त झालेली असून त्यात होरपळून निघत आहे प्रशासनाचा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशाराच संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.रावसाहेब दानवे यांची प्रतिमा जाळुन जाहीर निषेध केला या वेळी
गजानन वाघ तालुकाप्रमुख, नगरसेवक रमेश ताडे,पुंडलिक पाटील,देविदास घोपे,संजय भुजबळ, समाधान पाटील, संतोष बोरसे,राजेश पांधी, शुभम पाटील, विशाल पाटील, पुंडलिक धुळे, शिवाजी मेहसरे,चांद कुरेशी, पांडुरंग उगले, दिलीप आकोटकर, अक्षय भालतडक, ईश्वर वाघ, दीपक बावस्कार, सुनील खवले,गजानन धुळे, गणेश धुळे, मुन्ना रावनचवरे, प्रशांत ताडे, गजानन देशमुख, रमेश हागे, संकेत रहाटे, मधू धुर्डे, केशव काळपांडे,दिलीप सिंह ठाकुर, युवराज देशमुख, सुभाष माने, अनिल खरे, पंकज भगत, गुड्डू काजी, नवाब देशमुख, शेख रफीक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे यावेळी उपस्थित होते.