$type=ticker$snippet=hide$cate=0

अधिकाऱ्यांकडून पाच नंबर साठवण तलावाची पाहणी

  आमदार आशुतोष काळेंनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या सूचना  कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा...

 


आमदार आशुतोष काळेंनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या सूचना 

कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत असलेल्या आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण झाले आहे. यापुढील कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार आशुतोष काळे प्रयत्नशील आहे. त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे पुढील कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे अशा सूचना त्यांनी  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या सूचनेवरून सबंधित अधिकाऱ्यांनी नुकतीच पाच नंबर साठवण तलावाची पाहणी केली आहे.

कोपरगाव शहराच्या नागरिकांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावण्याचे दिलेल्या वचनाची वचनपूर्ती निवडून आल्यानंतर तीनच महिन्यात करून प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण केले आहे. यापुढील काम लवकरात लवकर सुरु करून पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा आमदार आशुतोष काळे यांचा मानस असून त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता प्रशांत कदम, उपअभियंता विवेक शेठे, सहाय्यक अभियंता मुकेश धकाते यांनी पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सोमवार दि. ७ रोजी समक्ष येऊन पाच नंबर साठवण तलावाची पाहणी केली आहे.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगावचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, संतोष चवंडके, नगरसेवक गटनेते वीरेन बिरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, युवकअध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, कृष्णा आढाव, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगर अभियंता दिगंबर वाघ, पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील आदी उपस्थित होते. पाच नंबर साठवण तलावाचे कामाला आमदार आशुतोष काळे यांच्याकडून चालना मिळत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5573,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10029,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,619,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15511,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12620,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3472,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3168,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अधिकाऱ्यांकडून पाच नंबर साठवण तलावाची पाहणी
अधिकाऱ्यांकडून पाच नंबर साठवण तलावाची पाहणी
https://maharashtrabhumi.com/admin/postimages/81c7416968da8612cdf9d924bf46ce28.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_134.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_134.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content