चालू वर्षी कांदा पिकात मोठी घट होण्याची चिन्ह येवला : आधीच सर्व व्यवसाय कोरोनामुळे ठप्प पडले होते थोड्या प्रमाणात शेती व्यवसाय चालू होता...
चालू वर्षी कांदा पिकात मोठी घट होण्याची चिन्ह
येवला : आधीच सर्व व्यवसाय कोरोनामुळे ठप्प पडले होते थोड्या प्रमाणात शेती व्यवसाय चालू होता एकीकडे कोरोनाचे थैमान कुठेतरी कमी होत असले तरी दुसरीकडे कांदा पिकांवर रोगांचे प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाहीये कांदा पिकावर मावा,करपा भुरी यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकरी हवा दिल झाले आहेत. सध्या कांद्याचा दर वधारत असुन येवला,चांदवड, नांदगाव या तालुक्यातील शेतकरी हा नवीन कांदा (उन्हाळ कांदा) लागवडीसाठी जोमाने लढत आहे. मात्र लागवड झालेल्या कांदा पिकावर मावा करपा भुरी थ्रिप्स या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे नुकसानीने बळीराजा हैराण झाला आहे. तालुक्यातील अंदरसूल येथील बाबासाहेब ढमाले या शेतकऱ्याने यांच्या शेतातील दोन एकर शेतात कांद्याची लागवडही केली मात्र लागवड केलेले कांदा रोप अचानक खाली मान टाकून सडत असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला यावर त्यांनी तालुक्यातील धुळगाव येथील शेळके-पाटील ॲग्रो एजन्सी यांच्याशी संपर्क करून योग्य तो सल्ला व मार्गदर्शन घेऊन आपले दोन एकर कांद्याचे पीक वाचवले याच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी हाच फार्मूला वापरतात आपले कांद्याचे पीक वाचवले परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून सतत ढगाळ वातावरण तुरळक पावसाचा सरी झाल्यामुळे मवा व करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे अशा परिस्थितीत तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे महागड्या औषधांचे स्प्रे करून देखील कांदा पिक चांगल्या पद्धतीने येत नसल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. हा प्रकार समजत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा लागवडीपासुन तर बाजारात नेण्यापर्यत शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.
असा येतो खर्चसाधारण एक एकराला :
कांदा बियाणे तीस हजार रूपयांचे लागते. त्यानंतर कांदा लागवड सात ते आठ हजार रूपये मजूरी लागते. औषधे व खते सात ते आठ हजारापर्यंत असा एका एकरासाठी साधारण पन्नास ते साठ हजार इतका खर्च येतो.
शिवाय रात्री व अपरात्री कांद्याला पाणी भरण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे राहावे लागते. इतकी सगळी मेहनत आणी खर्च करुन शेतातील कांदा पिक हे नष्ट होतांना दिसत आहे. तेव्हा याची दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने सदर पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तसे कांदा पीक पुर्वी घेणे अगदी सोपे होते परंतु हल्ली वातावरणामध्ये सततचा बदल यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो अशा परिस्थितीत देखील योग्य मार्गदर्शन व सल्ला घेतल्यास चांगले पीक घेता येते याचा अनुभव मला शेळके-पाटील ॲग्रो एजन्सी यांच्याकडून मिळाला.
बाबासाहेब ढमाले शेतकरी अंदरसुल
सध्या गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे कुठे तुरळक पावसाच्या सरी देखील होत आहे अशा परिस्थितीमध्ये मावा करपा येण्याचे संकेत मोठ्या प्रमाणावर असतात या रोगांच्या संबंधित प्रतिबंधक औषधांची वेळेवर फवारणी करावी या वातावरणामध्ये हळूहळू बदल होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठे हतबल होऊ नये.
कारभारी नवले तालुका कृषी अधिकारी येवला.