पारनेर/प्रतिनिधीः पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या सधन बागायती पट्ट्यातील जवळे ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपले राजकिय नशीब ...
पारनेर/प्रतिनिधीः
पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या सधन बागायती पट्ट्यातील जवळे ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपले राजकिय नशीब अजमवण्यासाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे दररोज इच्छुकांची संख्या वाढत असल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज ही अजून वाढणार असल्याचे चित्र आहे.
जवळे गावात एकूण पाच प्रभाग येत असून एकूण पंधरा जागासाठी निवडणूक होणार आहे. मध्यंतरी बिनविरोध निवडणुकीसाठी गाव पातळीवरुन तालुका पातळीवरपर्यंत काही गावातील गाव कारभार्यांनि प्रयत्न केले परंतु सगळ्यांनाच सत्ता पाहिजे असल्याने, लोकांपेक्षा पुढार्यातच एकमत न झाल्याने बिनविरोध बारगळली व निवडणुकीचा बिगुल वाजला. व उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आता अर्ज दाखल करण्यास दोन दिवसच उरले असून बुधवारी मुदत संपणार आहे पॅनेल प्रमुखांचाही चांगलाच कस लागणार असून कोणाला उमेदवारी द्यावयाची व कुणाची काढायची याची फिल्डींग सुरू झाली आहे.