उपचारार्थ संस्कृतिक राजधानीतून 21 हजाराची मदत वडवणी । प्रतिनिधीः- विज पडून जखमी झालेल्या महिलेची प्रशासनाकडून थट्टा आशी बातमी अनेक वृत्तमान ...
उपचारार्थ संस्कृतिक राजधानीतून 21 हजाराची मदत
वडवणी । प्रतिनिधीः-
विज पडून जखमी झालेल्या महिलेची प्रशासनाकडून थट्टा आशी बातमी अनेक वृत्तमान पत्रातुन छापुन त्या जखमी महिलेची आणि त्यांच्या कुंटुबाची कैफियात मांडली होती. वृत्तमानपत्र वाचून संस्कृतिक राजधानी अर्थात पुण्यात वास्तव करणाऱ्या सिध्देश्वर फंदे यांची लोकसेवा समाजिक फांउडेशन महा.राज्य या संस्थेने 21 हजाराची मदत करत माणुसकीचा धर्म निभावला आहे.
दि.1 आँगस्ट 2020 रोजी शेतातून घरी येत आसताना अचानक वाऱ्यासह मेघगर्जना होत आहे.म्हणुन बोरीच्या झाडाखाली थांबलेल्या महिलेच्या अगदी शेजारीच विज पडून मौजे चिंचोटी येथील सौ.सत्यभामा अंकुश गोंडे वय-54 वर्ष या गंभीर जखमी झाल्या होत्या.बीड आणि औंरगाबाद येथील खाजगी दवाखान्यात जवळपास साडेतीन लाखाच्या वर खर्च झाला होता.परंतू वडवणी तालुका प्रशासनाने फक्त 12 हजार 700 रु.मदत देऊन एक प्रकारे थट्टाच केली असल्याची बातमी विज पडून जखमी झालेल्या महिलेची प्रशासनाकडून थट्टा अशा अशयाचे सविस्तर वृत्त प्रकाशित करुन जखमी महिलेची आणि त्या कुंटुबियाची किफायत मांडून आवाज उठविला होता.साजं दै.रिपोर्टर व आनेक वृत्तपत्रातुन प्रसिध्द झाले त्याच दिवशी पुण्यात वास्तव्यास असणारे सिध्देश्वर फंदे यांनी हे सविस्तर वृत्त वाचले आणि कोणत्याच प्रकारचा विलंब न लावता रिपोर्टरचे वडवणी तालुका प्रतिनिधी भैय्यासाहेब तांगडे व चिंचोटी येथील चंपावतीपञाचे पत्रकार रामेश्वर गोंडे यांना भ्रमणध्वनीद्वारे व तसेच सोशिअल मिडियाच्या मध्यमांतून सिध्देश्वर फंदे यांनी स्वताची संस्था असणाऱ्या लोकसेवा समाजिक फाऊंडेशन महा.राज्य या संस्थेच्या वतीने समाजिक भान ठेवत एक हात मदतीचा या भावनेतून सौ.सत्यभामा गोंडे यांचे पती अंकुश भानुदास गोंडे यांच्या नावे तब्बल 21 हजार रुपायाचा संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष सिध्देश्वर फंदे,उपध्यक्ष सुर्यकांत सावंत,अँड.गौत्तम भालेराव मित्र मंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे,प्रगतशिल शेतकरी धनपाल गोंडे,रिपोर्टरचे पत्रकार भैय्यासाहेब तांगडे,एमडीएल न्यूजचे संपादक ओम साबळे यांच्या उपस्थित धनादेश सुर्पत करुध प्रशासनाने कागदपत्रे रंगवून हरवलेल्या कुंटुबाला सिध्देश्वर फंदे यांनी मदतीचा हात देऊन जिवन जगण्याचा मार्ग सुकार केल्याने त्यांच्यासह वृत्त प्रकाशित करणाऱ्या रिपोर्टरच्या लेखनीला हि सर्वसामान्यातून सलाम केला जात आहे.
माणुसकी जिवंत आहे...!
दै.निकातील बातत्या वाचल्या आणि स्तभ झालो,माझ्यामधील माणुसकी धर्म जागा झाला आणि या जखमी महिलेला मदतीचा हात देण्याचे ठरवले आणि काल सकाळी आठ वाजता पुण्याच्या घराबाहेर पडलो गाडीचे चाक हे चिंचोटी या गांवाकडे फिरले आणि चार वाजण्याच्या सुमारास जखमी महिलेची अस्थेपनाने विचारपुस केली,कुंटुबियाशी बोलले आणि जखमी पतीच्या नावाने उपचारासाठी आणि घरप्रंपचासाठी 21 हजार रुपायांचा धनादेश दिला यावरुन सिध्देश्वर फंदे यांच्या या दायित्वातून अजून माणुसकी जिवंत आहे....याचं उदाहरण काल दिसून आले..