$type=ticker$snippet=hide$cate=0

घडयाळ घोटाळयाचा पर्दाफाश करण्यासाठी कोर्टात जाऊ ः डावखरे

  पारनेर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधार्‍यांनी सभासदांना शताब्दीमहोत्सवानिमित्त दिलेल्या घडयाळ खरेदीत जवळ जवळ...

 



पारनेर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधार्‍यांनी सभासदांना शताब्दीमहोत्सवानिमित्त दिलेल्या घडयाळ खरेदीत जवळ जवळ 35 लाख रुपयांचा अपहार केला असून वेळोवळी सभासद म्हणून आम्ही या व्यवहाराची कागदपत्रे बँकेकडे मागून देखील सभासदांचा हक्क असताना न्यायालयीन प्रक्रिया या नावाखाली संबंधित कागदपत्रे देण्यास बँकेच्या प्रशासनाने सत्ताधार्‍यांच्या दबावापोटी उपनिबंधक यांनी बँक प्रशासनास दोन वेळा स्पष्ट लेखी आदेश देऊनही खोटी कारणे दाखवून माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे. 

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील या भ्रष्टाचारात सहभागी असून तत्कालीन बँकेचे अध्यक्ष साहेबराव अनाप व प्रशासनाने संगनमताने सभासदांची आर्थिक लूट केलेली आहे. कर नाही त्याला डर कशाला हवी. वर्षभरापासून अर्ज विनंत्या करुन देखील घडयाळ खरेदीबाबत कागदपत्र दिली जात नाहीत. जे घडयाळ बाजारात फक्त 300 रुपयांत विकत मिळते. त्या घडयाळाची किम्मत सत्ताधार्‍यांनी 600 रुपये लावली आहे. या संबंधातील सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून आम्ही सनदशीर मार्गाने मा डी. डी. आर यांनी नियूक्त केलेल्या चौकशी अधिकार्‍यांकडे दिनांक 6 जानेवारी रोजी देणार आहोत. चौकशी सुरू झाली असून चौकशी अधिकारी मा. खेडेकर साहेब यांचे पत्र प्राप्त झाले असून आम्ही चौकशी कामी उपस्थीत राहणार आहोत. चौकशीअधिकार्‍यांनी चौकशी सुरू केली असून आम्ही उपस्थीत राहूण आमची सभासदहितासाठीची बाजू मांडणार आहोत. परंतू चौकशी अधिकार्‍यांकडून न्याय न मिळाल्यास प्रसंगी वरिष्ठ कार्यालय व न्यायव्यवस्थेकडे देखील न्याय मागणार आहोत .बँक प्रशासनाने केवळ  माजी अध्यक्ष साहेबराव अनाप यांच्या दबावामुळे आम्हाला अद्यापपर्यंत कागदपत्र दिलेली नाहीत. याविरोधात मंगळवार 22 रोजी आम्ही डीडीआर कार्यालयात घंटानाद आंदोलन केलेले आहे.


कागदपत्रे उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन ःप्रवीण ठुबे 

घड्याळा संबंधाने कागदपत्र उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून मुख्य. कार्यकारी अधिकारी यांची आहे. त्यांनी प्रशासन म्हणून आम्हाला उपनिबंधक कार्यालयाने आदेश देऊनही कागदपत्रे 15 दिवसांत उपलब्ध करुन न दिल्यास त्यानंतर केव्हाही बँकेच्या कार्यालयात येऊन शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाचे कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयाला टाळे ठोकतील असा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी आजच्या घंटानाद अांदोलन प्रसंगी दिला.


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15277,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12359,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: घडयाळ घोटाळयाचा पर्दाफाश करण्यासाठी कोर्टात जाऊ ः डावखरे
घडयाळ घोटाळयाचा पर्दाफाश करण्यासाठी कोर्टात जाऊ ः डावखरे
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/generic_md_75/public/news-story/cover-images/4Court_Decision_h_13.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_152.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_152.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content