$type=ticker$snippet=hide$cate=0

प्लास्टिक मुक्तीदिनी गोदाघाटावर तराजूःप्लास्टीकची पृथ्वीच्या वजनावर मात

नाशिक/प्रतिनिधी :  प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचा होणारा हास आणि त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 11 डिसेंबरला प्लास्टिक मुक्ती द...


नाशिक/प्रतिनिधी :

 प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचा होणारा हास आणि त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 11 डिसेंबरला प्लास्टिक मुक्ती दिन साजरा केला जातो . मानव उत्थान मंचच्या वतीने दरवर्षी 11 डिसेंबरला गोदघाटावर प्लास्टिक न वापराबाबत जनजागृती केली जाते . प्रामुख्याने जनतेचं लक्ष वेधण्यासाठी रामकुंडावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्यांपासून स्ट्रक्चर उभे केले जाते . आणि त्यातून प्लास्टिकच्या वस्तू वापराबाबत होणारे दुष्परिणाम यावर पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी प्रबोधन केले जाते . देश - विदेशातील नागरिकांमध्ये हा संदेश देण्यासाठी आतापर्यंत 70 हजार किलो बाटल्यांचा राक्षस , प्लास्टिकचा अजगर , प्लास्टिकची पृथ्वी व प्लास्टिकचा मोठा मासा बनविण्यात आलेला होता . त्यातून मानव उत्थान मंच प्लास्टिकमुळे सोयीचे वाटणारे प्लास्टिक नंतर कसे धोकादायक होऊ शकते याबाबत जनजागृती करत आहे . कोरोना महामारी मुळे या वर्षी संपूर्ण लॉकडाउनच्या नियमाचं पालन करून गोदावरी नदीच्या किनारी भला मोठा तराजू काटा उभा करण्यात आला आहे . या तराजू काट्या मध्ये एका बाजूला पृथ्वी तर दुसऱ्या बाजूला प्लास्टिक अशीच तुलना केली गेली आहे .या तराजूचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

गेल्या पाच वर्षापासून मानव उत्थान मंच'च्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती दिनानिमित्ताने  वेगवेगळ्या माध्यमातून जनतेमध्ये प्लास्टिकच्या संदर्भात जनजागृती केली जात आहे.हा तराजू काटा  नागरिकांमध्ये जनजागृती व प्रबोधनासाठी  नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत उभा केला जाणार आहे.

झकिया शेख, पंकज जोशी, विश्वनाथ ढाके,  शांतनू कोळी, विष्णु नायर, पुखराज आदींनी हा संपूर्ण तराजू तयार करण्यात आला.. या कार्यक्रमासाठी जगबिर् सिंग , निशिकांत पगारे,  योगेश बर्वे, प्रा सोमनाथ मुठाल , एकनाथ सावले, कुलदीप कौर, वैशाली चव्हाण, ऍड मिलिंद बाबर, आरोग्य अधिकारी कल्पना कुटे, सोनवणे  विभागीय अधिकारी नितीन धांडे, संजय दराडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..


 


"गोदावरी नदी प्रदूषित करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे प्लास्टिक आहे. 

गोदावरी नदी प्रदूषण जनहित याचिकेवर मा उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितले आहे की नदी प्रदूषणात  प्रशासना सोबत जनतेचाही सहभाग आहे त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती व प्रबोधन होणे आवश्यक आहे. यासाठी मानव उत्थान मंच गेले पाच वर्षापासून प्लास्टिक मुक्ती दिन हा उपक्रम राबवत आहे तो खरोखर अभिमानास्पद आहे".

 निशिकांत पगारे याचिकाकर्ता तथा अध्यक्ष गोदावरी गटारीकरण विरोधी मंच नाशिक

 


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15277,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12359,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: प्लास्टिक मुक्तीदिनी गोदाघाटावर तराजूःप्लास्टीकची पृथ्वीच्या वजनावर मात
प्लास्टिक मुक्तीदिनी गोदाघाटावर तराजूःप्लास्टीकची पृथ्वीच्या वजनावर मात
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_153.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_153.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content