$type=ticker$snippet=hide$cate=0

मातंगाचे अस्तित्व धोक्यातःदिपकभाऊ केदार

माजलगांव । पतिनिधीः- पुरोगामी राज्यात एकापाठोपाठ रोज मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. याचप्रकारचा हल्ला हिवरा बु.ता.माजलगांव ये...


माजलगांव । पतिनिधीः-

पुरोगामी राज्यात एकापाठोपाठ रोज मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. याचप्रकारचा हल्ला हिवरा बु.ता.माजलगांव येथील मातंग समाजावर तिस ते पस्तिस जातिय वाद्यांनी धारधार शस्त्राने हल्ला करुन त्यांना भयभीत केले.तसेच त्यांचेवर पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत.म्हणुन मातंगाचे अस्तित्व धोक्यात आले आहे,असे मत पत्रकार परिषदेत दि.17 रोजी ऑल इंडीया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी व्यक्त केले. दिपक केदार यांनी हिवरा बु.येथे पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन पत्रकार परिषद दि.17 रोजी सायं 6:10वा व्यंकटेश हॉल,बीड रोड, बजाज कॉम्पलेक्स माजलगांव येथे घेण्यात आली.यावेळी ते म्हणाले कि,महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेकडो हत्याकांड झाले आहेत.यावर कोणतही सरकार दखल घेत नाहीत.विरोधक असो कि सत्ताधारी असो दोघेही दलित घटकांचे मुळावर उठले आहेत.तिस ते चाळीस जातीयवाद्यांनी शस्त्र हातात घेऊन हा हल्ला केला.यावर कोणत्याही लोक प्रतिनिधी,आमदार खासदार किंवा पालकमंत्री या पिडीत कुटुंबियांना भेटले नाहीत. आरोपींवर कारवाई करण्याचे सोडुन या पिडीतांवर दरोड्या सारखे गुन्हे दाखल केल्या गेले आहेत.पोलिस हे राजकिय दबावाखाली काम करत आहेत. या डीएसवायपी यांचेशी संपर्क केला असता आम्ही कोणाच्याही तक्रार अर्जावर गुन्हे दाखल करत असतो.ऑल इंडीया पँथर सेना दलित अत्याचारांच्या विरोधात बंड करणार असुन दलित बचाव आंदोलन उभा करणार आहे.सत्ताधारी लक्ष देत नाहीत.ते कायदा व सुव्यवस्था राखली जात नाही.कायद्याचा धाक राहिला नाही.त्यामुळे आता आंबेडकरी समुह, बौद्ध,मातंग,आदीवासी समुहात उद्रेक निर्माण झाला आहे.आता रस्त्यावर आल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. विधानपरिषदेत मातंगाना खुश करण्यासाठी भाषण बाजी केल्या जाते पण वास्तवात दलित अत्याचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदार संघात होत आहेत.दलित अत्याचार हा राष्ट्रीय मुद्दा झाला असुन दलितांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे.आपण लवकरच माजलगाव येथे बौद्ध मातंग बचाव आंदोलन छेडणार आहोत.भाजपा विरोधीपक्ष म्हणुन दलितावर बोलत नाही. सत्ताधारी मुग गिळुन गप्प बसलेत.आजची सत्ता मानवहिन,संवेदनाहीन आहे,असे केदार म्हणाले. यावेळी विनोद भोळे, किरण तुपे,बंटीभाई सदाशिवे,ता.अध्यक्ष सोनाजी घडसे व प्रल्हाद डावरे उपस्थित होते.

-------------

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5567,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,12,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,665,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12590,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1472,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मातंगाचे अस्तित्व धोक्यातःदिपकभाऊ केदार
मातंगाचे अस्तित्व धोक्यातःदिपकभाऊ केदार
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_154.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_154.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content