बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे बुलडाणा येथील सहयोग हॉस्पिटलच्या डॉक्टर मनीषा चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेच्या गर्भातील मृत अर्भक ...
बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे
बुलडाणा येथील सहयोग हॉस्पिटलच्या डॉक्टर मनीषा चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेच्या गर्भातील मृत अर्भक वेळीच नकाढल्यामुळे गर्भवती माता मालता दीपक पारधे वय वर्ष 24 वर्ष राहणार सिल्लोड असे मृत महिलेचे नाव आहे मालता दीपक पारधे ह्या बाळंतपणासाठी आपल्या आईकडे बुलडाणा येथील इंदिरानगर येथील घरी आली होती तर 14 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्यांना शहरातील सहयोग हॉस्पिटल मध्ये भरती केले होते. उपचारापूर्वी डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तेव्हा सदर महिलेच्या पोटातील बाळ मृत्यू पावल्याचे डॉक्टर मनीषा चव्हाण यांनी परिवारातील सदस्यांना सांगितले परंतु त्यानंतर पेशंटकडे फिरकले नाही व नंतर उशिरा मालता यांचे उपचार करण्यात आले संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांच्या पोटातील बाळ काढण्यात आले मालता यांची तब्येत ठणठणीत असताना रात्री दहानंतर तब्येत बिघडली असतांना रात्री दहानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना डॉक्टर चव्हाण यांनी रुग्णाच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला आणि रुग्णाला मारहाण केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी मालता यांची बहीण मिराबाई खंडागळे यांनी सांगितले अखेर रात्री पावणे दहाच्या दरम्यान मालता यांची प्राणज्योत मालवली त्यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडला मालता यांचे भाऊ राहुल घाडगे यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दिली व जोपर्यंत डॉक्टर चव्हाण यांच्यावर पोलीस कार्यवाही होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची ठोक भूमिका घेतली चार वर्षांपूर्वी मालता यांचा प्रेमविवाह दीपक पारधे यांच्याशी झाला होता त्या उपचारासाठी बुलडाणा येथे आल्या होत्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझी पत्नी व बाळही गेल्याने त्यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला व त्यांनी डॉक्टरांना धारेवर धरले वृत्त लिहीपर्यंत डॉक्टरांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पुढील तपास बुलडाणा पोलीस शहर करीत आहे.
-----------------------