नाशिक/प्रतिनिधी मराठा आरक्षणाला सर्वोच्च स्थगिती मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि बेरोजगार तरूणांमध्ये निर्माण नैराश्याची कोंडी फोडण्यासाठी सकल म...
नाशिक/प्रतिनिधी
मराठा आरक्षणाला सर्वोच्च स्थगिती मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि बेरोजगार तरूणांमध्ये निर्माण नैराश्याची कोंडी फोडण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात विविध मराठा संघटना एकञ येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा आहे.ओबीसीच नव्हे तर कुठल्याही बहुजन समाजाच्या ताटातलं ओढून घेण्याचा समाजाचा हेतू नाही,किंबहूना अगदी प्राचीन काळापासून मराठा समाजाने अठर पगड बारा बलुतेदार बहुजन समाजाला सोबत घेऊन समाजकारण केले असतांना हक्काची लढाई लढतांना मराठा समाजाकडे संशयाने पाहून बदनाम करण्याच्या प्रवृत्तीवर मराठा समाजातून तिव्र नापसंती व्यक्त केली जात असून विशेषतः मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा परस्पर नसलेला संबंध जोडून काही राजकीय नेते उभय समाजातील सलोख्याला दंश करीत असल्याचा आरोप समाजातील तरूण समन्वयकांकडून होऊ लागला आहे.
मराठा महासंघाचे पदाधिकारी तसेच क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप यांनी यासंदर्भात एक पञक प्रसिध्दीस दिले असून या पञात त्यांनी थेट ना.छगन भुजबळ यांना थेट आवाहन देतांना ना.भुजबळ यांनी ओबीसी प्रवर्गाच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करून त्यांचे पालनहार जरूर व्हावे माञ त्याचवेळी केवळ राजकीय ध्रूवीकरणासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करून अवघ्या समाजाचा रोष ओढवून घेऊ नये.उलट समाजाच्या प्रामाणिक भावना समजून घेऊन मराठा आरक्षणाला बळ देऊन मराठ्यांचे तारणहार व्हावे अशी साद घातली आहे.
तुषार जगताप यांनी या पञकात म्हटले आहे की,मराठा समाजाला कुणाचे आरक्षण ओरबडायचे असते तर यापुर्वीच ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळवण्यासाठी समाजाने संघर्ष केला असता.माञ सकल समाजात ही भावना नाही.तर मराठा समाज अगदी पहिल्या दिवसांपासून स्वतंञ आरक्षण मागत आहे.हे सत्य दडवून ना.भुजबळ यांच्या छञछायेखाली काही मंडळी ओबीसी समाजाला मराठा समाजाविषयी भडकावत आहेत.पुणे येथे समिर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचा दाखला देऊन तुषार जगताप म्हणतात की सत्तेवर असलेली मंडळीच आरक्षण बचावचा नारा देऊन मराठा समाजाविरूध्द वातावरण निर्मिती करीत आहेत.सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा तरूण हातपाय खोडत आहे,त्याला आधार देण्याचे सोडून त्याच्या जखमांवर प्रतीमोर्चाचे मीठ चोळण्याचा हा उपद्व्याप जाणीवपुर्वक सुरू आहे.आपल्याच पक्षाच्या सरकारविरूध्द मोर्चा काढण्याची नौटंकी समाजाच्या डोळ्यात धुळफेक राजकारण आहे, पोलीसी बळाचा वापर करून आंदोलन दडपल्याचा आरोपही अशीच धुळफेक आहे.सत्ता त्यांचीच ,गृहमंञी त्यांचेच,मग आवाज कोण कुणाचा दाबतो आहे.याचे उत्तर ना.भुजबळ यांनी द्यायला हवं.
ना.छगन भुजबळ हे केवळ एका समाजाचे नेते नाहीत तर मआञी म्हणून ते राज्याचे नेतृत्व करीत आहे या भुमिकेला न्यायसंगत निर्णय त्यांच्याकडून अपेक्षित असतांना केवळ राजकीय अभिनिवेश बाळगून मराठा आरक्षण चळवळीला बदनाम करण्यासाठी हा खेळ करणे त्यांनी थांबवावे.ओबीसी समाजाचे पालनहार म्हणून त्यांच्या भुमिकेचे सकल मराठा समाज स्वागतच करीत आहे.माञ त्याचवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाला केवळ विरोधासाठी विरोध न करता या समाजालाही न्याय देण्याची भुमिका घेऊन मराठा समाजाचेही त्यांनी तारणहार व्हावे असे आवासन तुषार जगताप यांनी भुजबळ यांना केले आहे.