लातूर / प्रतिनिधी : मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीला वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. घरातून पळाल्यानंतर पीडित तरुण...
लातूर / प्रतिनिधी : मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीला वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. घरातून पळाल्यानंतर पीडित तरुणी प्रियकराच्या घरी राहत होती; मात्र पैशांच्या हव्यासातून त्याच्या आईने तरुणीवर ही दुर्दैवी वेळ आणली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लातूरमध्ये राहणार्या अल्पवयीन तरुणीचे एका अल्पवयीन तरुणावर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरातून पळ काढल्यानंतर पीडिता प्रियकराच्या घरी राहायला आली. सुरुवातीला प्रियकराच्या आईने तिला ठेवून घेतले; मात्र काही दिवसांनी त्याच्या आईने उचललेल्या धक्कादायक पावलामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रियकराची आई अर्थात आरोपी महिलेने पीडित अल्पवयीन तरुणीला चक्क कला केंद्राकडे पाठवले. त्या मोबदल्यात तिने काही पैसेही घेतले; मात्र पीडिता अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव तिला परत पाठवण्यात आले. कला केंद्रातून परत आल्यानंतरही पीडितेच्या दुर्दैवाचे दशावतार थांबले नाहीत. प्रियकराच्या आईने तिला पुन्हा बीडमधील अंबाजोगाईच्या एका वेश्या व्यवसाय करणार्या महिलेकडे ठेवले. तिथे तिच्यावर पैसे देऊन दोघांनी लैंगिक अत्याचार केले.
पीडितेची प्रकृती बिघडल्याने पुन्हा तिला प्रियकराच्या आईच्या हवाली करण्यात आले; मात्र महिलेने तिचा छळ एवढ्यावर थांबवला नाही. तिला पुन्हा दुसर्या कला केंद्रात पाठवण्यात आले. अखेर पीडित तरुणीने मोठ्या हिमतीने पोलिसांकडे धाव घेत आपली हकिगत सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.