मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे सोमवारी एकदिवसीय पुणे दौऱ्यावर असून पुणे जिल्हयातील भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभास 1 जानेवारी रोजी...
मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे सोमवारी एकदिवसीय पुणे दौऱ्यावर असून पुणे जिल्हयातील भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभास 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता मानवंदना देणार आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी सदरच्या ऐतिहासिक स्थळाला मानवंदना देण्यासाठी डॉ नितीन राऊत स्वतः उपस्थित राहणार आहेत. मानवंदना दिल्यावर भीमा कोरेगाव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. त्यानंतर डॉ नितीन राऊत वढु (बद्रुक), तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ व वढु येथे सिद्धनाथ गायकवाड (महाराज), स्थळाला भेट देऊन मानवंदना देतील. याच दरम्यान सिद्धनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करतील.
डॉ. राऊत हे यानंतर पुणे शहरात परतणार असून सकाळी 11 वाजता वाडिया महाविद्यालयासमोर पंचशिल चौक येथील माता रमाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर ताडीवाला रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयालाही सकाळी 11.15 वाजता डॉ राऊत भेट देणार आहेत. दुपारी अडीच वाजता शिवाजी नगर येथील काँग्रेस भवन येथे ते कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत.