बुलढाणा/प्रतिनिधी. संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील एकमेव संघटना आहे महाराष्ट्र भर ...
बुलढाणा/प्रतिनिधी.
संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील एकमेव संघटना आहे महाराष्ट्र भर सरपंच यांच्याशी थेट संवाद साधू संघटन कौशल्य मजबुत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून राज्यात कार्यकर्ते काम करत आहे राज्य भर विविध ठिकाणी जिल्हा बैठका जिल्हा मेळावे कार्यकारणी बैठका आयोजित करून सरपंच यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामविकास विभागाच्या योजनेचा फायदा सर्व सामान्य माणसाला आधार देण्याचे कार्य सातत्याने सरपंच करीत आहे या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र करून एकंदर ग्रामविकास साधन्याच्या हेतु काम करत असताना अनेक विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कटीबद्ध आहे अशी माहिती संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील अध्यक्ष भाऊ मरगळे , रविंद्र पवार, यादवराव पावसे, शंकरराव खेमनर पाटील, नवनाथ शिंदे,भाग्यश्री नरवडे, रविराज गाटे,पंकज चव्हाण, गणेश तायडे,अँड भाऊसाहेब गुंजाळ, विक्रम भोर यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे दिली आहे सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान नेतृत्त्वाचा सन्मान कर्तृत्वाचा विविध राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि ६जानेवारी २०२१ रोजी दुपारी 3वा शिर्डी येथे संपन्न होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळा शासकीय नियमानुसार होणार सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार संपादक रविंद्र वाघ साप्ताहिक अखंड झेप
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सदस्य मु.पो. सारशिव ता मेहकर जि बुलढाणा पुरस्कार जाहीर झाला आहे सन्मानचिन्ह शाल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या वेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , आदर्श सरपंच पोपटराव पवार, समाजप्रबोधन हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या सह अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे..