$type=ticker$snippet=hide$cate=0

अंबाजोगाई पंचायत समितीतील तिढा सुटेना!

एक विरुद्ध अकरा:सलग चौथ्या बैठकीवर सर्व सदस्यांचा बहिष्कार विविध ठराव रखडले;सोमवारी पुन्हा बोलावली बैठक अंबाजोगाई । प्रतिनिधीः- येथील पंचायत...


एक विरुद्ध अकरा:सलग चौथ्या बैठकीवर सर्व सदस्यांचा बहिष्कार विविध ठराव रखडले;सोमवारी पुन्हा बोलावली बैठक

अंबाजोगाई । प्रतिनिधीः-

येथील पंचायत समितीच्या सभापती विजयमाला जगताप यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत अंबाजोगाई पंचायत समितीच्या उपसभापतींसह उर्वरित सर्वच अकरा सदस्य एकवटले आहेत. आतापर्यंत चार मासिक बैठकांवर या सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला आहे. कोरम अभावी गुरुवारची (दि.17) मासिक बैठक तहकूब करावी लागल्याने रखडलेले ठराव घेण्यासाठी सभापतींनी स्वत:च्या अधिकारात सोमवारी (दि.21) तातडीची बैठक बोलावली आहे.

अंबाजोगाई पंचायत समिती सध्या पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. वर्षभरापासून सभापती विजयमाला जगताप यांच्यावर मनमानी कारभार आणि त्यांचे सुपुत्र प्रा. प्रशांत जगताप यांच्या वाढत्या हस्तक्षेपाचा आरोप करून उपसभापती आणि इतर सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली. सभापती मनमानी कारभार चालवतात, विश्वासात घेत नाहीत अशा तक्रारी सर्व सदस्यांकडून होऊ लागल्या. त्यामुळे उपसभापती अलिशान समीर पटेल, सदस्य सदस्य मीना भताने, तानाजी देशमुख, मच्छिंद्र वालेकर, सरस्वती कोकरे, अनिता भिसे, कडाबाई चामनर, विठ्ठल ढगे, रखमाजी सावंत, बिभीषण गीते, सतीश केंद्रे यांनी एकत्र येत चार महिन्यापासून मासिक बैठकांवर बहिष्कार टाकला. तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून केवळ मागील महिन्यात या सदस्यांनी बैठकीला नाममात्र हजेरी लावली. दरम्यानच्या काळात हा तिढा पालकमंत्र्यांकडे गेला, परंतु तिथूनही यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर गुरुवारी (दि.17) या सदस्यांनी दांडी मारल्याने चौथी मासिक बैठक कोरमअभावी तहकूब करावी लागली. त्यामुळे सभापती जगताप यांनी अधिकाराचा वापर करत बैठक बोलवण्यास सांगितल्याने गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांनी सोमवारी (दि.21) दुपारी 1 वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र सर्व सदस्यांना पाठविले आहे.

सर्वसाधारण बैठकीवर प्रश्नचिन्ह

लवकरच पंचायत समितीची सर्वसाधारण बैठक आहे. यात पं.स.ने मंजूर केलेल्या मनरेगा वार्षिक कृती आराखडा हे प्रस्ताव सादर करावे लागतात, त्यावर चर्चा झाल्यानंतर हे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतात. त्यामुळे या सभेस अनन्यसाधारण महत्व आहे. त्यापूर्वी हा तिढा जर सुटला नाहीतर अडचणी उद्भवू शकतात.

सभापतींनी दीर्घकालीन रजा घेतली वापस

दरम्यान, सभापती जगताप यांनी 179 दिवसांच्या रजेवर जात असल्याचे पत्र गटविकास अधिकार्‍यांना दिले होते. त्यामुळे हा तिढा सुटला असे वाटले होते. मात्र, एकच दिवसात त्यांनी रजेवर जाण्याचा स्वत:चा निर्णय रद्द करत रजेचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकवटलेले सर्व नाराज सदस्य आता सभापतींच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. पालकमंत्र्यांनी यावर त्वरित तोडगा काढला नाही तर सर्व सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

-----------

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10046,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15561,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12672,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अंबाजोगाई पंचायत समितीतील तिढा सुटेना!
अंबाजोगाई पंचायत समितीतील तिढा सुटेना!
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_169.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_169.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content