नवी दिल्ली:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या...
नवी दिल्ली:-
केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या सहा बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. दरम्यान शेतकऱ्यांनी काल पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं होतं. “शेतकरी आंदोलना दरम्यान गोळी झेलण्याची वेळ आळी तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची ही मुलगी सर्वात आधी गोळी झेलेल”, असा एल्गार महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी केला आहे.
आपल्या महाराष्ट्राने भारत बंदला सर्वाधिक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्राच्या बांधवाना सांष्टांग दंडवत करते. शेतकऱ्याची मुलगी असल्याच्या नात्याने मी या आंदोलनाला समर्थन करते. पंजाब, हरियाणाचे शेतकरी आमचे भाऊ आहेत. मी सगळ्यांना नमस्कार करते. पक्षवाल्यांनी आपल्याला सगळ्यांना हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा जातींमध्ये वाटून दिलं होतं. मात्र, या आंदोलनाने दाखवून दिलं न आम्ही हिंदू आहोत, न मुसलमान आहोत, न सीख आहोत, न ईसाई आहोत. आम्ही या देशाचे शेतकरी आहोत, असं पूजा मोरे म्हणाल्या.
दरम्यान, दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असं म्हटलं जात आहे की, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
------------------------