श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी ः अतिवृष्टीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील काही भागांत कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याची ...
यंदाच्या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्यामुळे चिंचेच्या झाडांना चिंचा अधिक लागल्या आहेत. त्यामुळे चिंचेचे अधिक उत्पादन मिळणार आहे. यामुळे चिंचा उत्पादक शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघणार आहे. आंबट गोड चवीमुळे परराज्यात चिंचेला अधिक मागणी आहे. तालुक्यातील घारगाव परिसरात शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला अनेक शेतकर्यांची चिंचेची झाडे पाहायला मिळतात. चिंचेच्या झाडांना सरळ, वाकडे असे मोठे आकडे दिसून येत आहेत. कोरोनामुळे यंदा शाळा बंद असल्यामुळे चिमुकली मुले चिंचा खाण्यासाठी शेतांनी हिंडत आहेत. चिंच ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कॅलसिअम, व्हिटॅमिन, पोटॅशियम चे प्रमाण असल्याने संधिवात दूर करण्यासाठी मदत होते. चिंच खाल्याने रक्त पातळ होते, ब्लड प्रेशर कमी होते. चिंच ही बहुगुणी असल्यामुळे पदार्थांची चव, जेवणाची रुची वाढवण्यासाठी चिंच फायदेशीर आहे. त्यामुळे चिंचेला मोठी मागणी आहे. त्यामुळे यामधुन शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.