केज। पतिनिधीः- कृषि विभाग आत्मा केज तालुका यांच्या वतीने तालुक्यातील विविध गावामध्ये रबी हंगामामध्ये घेण्यात येणारे हरभरा, करडी, कांदा,गहू,ज...
केज। पतिनिधीः-
कृषि विभाग आत्मा केज तालुका यांच्या वतीने तालुक्यातील विविध गावामध्ये रबी हंगामामध्ये घेण्यात येणारे हरभरा, करडी, कांदा,गहू,ज्वारी अश्या विविध पिकाची शेतीशाळा कार्यक्रम सुरु असून आज त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातीलच कानडीमाळी येथे कांदा पिकाची शेतीशाळा घेण्यात आली यामध्ये रब्बी कांदा पिकाची दर 15 दिवसांनी माहिती देण्यात येत असून सदरील सत्रामध्ये कांदा वरील करपा नियंत्रणासाठी बावीस्टीन, (एम 45,) किंवा केबरीटॉप, कर्जेट या बुरशी नाशक पावडर हे औषध प्रति 1लिटर पाण्यात 2 ग्राम वापरून फवारनि करावी याबद्दल योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच खत व्यवस्थापन या मध्ये 12.32.16.हे तीन घटक असणारे पज्ञि खत कांदा पिकासाठी फायदेशीर असल्यामुळे त्याचा वापर करावा असेही मार्गदर्शन करताना योगेश पाटील यांनी सांगितले अनिल लोंढे यांनी भाजीपाला उत्पादक शेतकरी यांच्या करिता संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार याविषयी माहिती दिली या वेळी उपस्थित कानेश्वर शेतकरी गटातील शेतकरी शंकर राऊत, शिवाजी राऊत, अमर राऊत, बलभीम राऊत कृषि सहाय्यक अनिल लोंढे, प्रवीण तीर्थकर श्री सोनवणे श्री येळकर व बीटीएम योगेश पाटील उपस्थित होते.