पुणे / प्रतिनिधीः व्हॉटस् अॅप ग्रुपवर एक जानेवारी मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाज विघातक पोस्ट, मजकुर, व्हिडिओ, आक्षेपार्ह पोस्ट ट...
पुणे / प्रतिनिधीः व्हॉटस् अॅप ग्रुपवर एक जानेवारी मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाज विघातक पोस्ट, मजकुर, व्हिडिओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अॅडमिनवर सर्वस्वी जबाबदार धरून प्रचलित नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 120 ग्रुप अॅडमिन व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 410 ग्रुप अॅडमिनला त्यासंदर्भात तशा लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या असल्याने यापुढील काळात ग्रुप अॅडमिनला ग्रुपवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे
.एक जानेवारी 2018 च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार परिसरात न घडू देण्यासाठी गेल्या वर्षीपासून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाले असून छोट्या छोट्या गोष्टींवरही जिल्हा पोलिस प्रशासनाचे बारकाईने अभ्यास केला आहे. दंगलीच्यानंतर व्हॉटस् अॅप ग्रुप, फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट व्हिडीओ पसरवित असतात. त्यातून सामाजिकस्वास्थ्य बिघडले जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने एक जानेवारी 2021 च्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलिस ठाण्यातील 120 व लोणीकंद पोलिस ठाण्यातील 410 ग्रुप अॅडमिनला या संधर्भात नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
या गुन्ह्यात तीन वर्ष शिक्षाही भोगावी लागणार असल्याने ग्रुप अॅडमिनला येत्या काळात आपल्या ग्रुपवर लक्ष देण्याची गरज असल्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.