$type=ticker$snippet=hide$cate=0

सरपंच पदाच्या आरक्षणाचा जिल्ह्यात सावळा गोंधळ

नव्याने आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये संभ्रम  श्रीगोंदा/विशेष प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर ...



नव्याने आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये संभ्रम 

श्रीगोंदा/विशेष प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मात्र सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत निवडणूक आयोगाकडून सावळा गोंधळ सुरु आहे. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा दिनांक जाहीर झाल्यानंतर पुन्हा ती तारीख रद्द करुन नव्याने हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील 1218  सरपंचाचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग (महिलांसह) यामध्ये विभाजन करून दिलेले आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याकडील  8 डिसेंबर 2020 रोजीच्या पत्राने श्रीगोंदे तालुक्यातील 86 सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी 14 व 15 डिसेंबर 2020 या तारखा सुचविल्या होत्या. उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर भाग यांनी श्रीगोंदे तालुक्यासाठी दिनांक 15 डिसेंबर 2020 ही आरक्षणाच्या सोडतीची तारीख निश्‍चित केली होती. श्रीगोंदा तहसिलदार यांनी त्यांच्याकडे 11 डिसेंबर 2020 च्या पत्रान्वये सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख 15 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 वाजता पंतनगर येथील न.पा. सभागृहात घेण्याचे पत्र काढले होते. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांनी निवडणूक आयोगाच्या 11 डिसेंबर 2020 च्या पत्राचा हवाला देऊन डिसेंबर 2020 रोजी तातडीने पत्र काढले की, 15 जानेवारी 2021 नंतर सरपंच आरक्षण कार्यक्रम राबविण्यात यावा. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम आता रद्द झालेला आहे. तो कार्यक्रम आता बहुतेक 18 जानेवारी 2021 नंतर म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतरच घेण्यात येईल व त्यानंतर सरपंच- उपसरपंच पदाच्या निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्र शासनाच्या 5 मार्च 2020 च्या अधिसूचनेनुसार सरपंचाची जनतेतून होणारी थेट निवडणूक राज्य शासनाने रद्द केली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. सरपंच पदाच्या आरक्षणाचा गोंधळ सबंध राज्यांमध्ये झाला आहे. पुणे जिल्ह्याने 8 डिसेंबर 2020 रोजी आपल्या सर्व तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षणे काढून गावनिहाय सरपंच पदे जाहीर केली आहेत. ज्या जिल्ह्यांनी 11 डिसेंबर 2020 पूर्वी सरपंचाची आरक्षण काढली आहेत, ती आरक्षणे अंतिम ठरलेली आहेत. मात्र ज्या जिल्ह्यांनी 11 डिसेंबर 2020 पर्यंत सरपंच पदाची आरक्षणे काढलेली नाहीत, या आरक्षणाच्या जाहीर झालेल्या तारखा आता रद्द झालेल्या असून,  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दिनांकानंतर म्हणजे 15 जानेवारी 2021 नंतर अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 1218 सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार आहे. निवडणूक आयोगाने अचानक 11 डिसेंबर 2020 रोजी सरपंच पदाची आरक्षणे 15 जानेवारी 2021 नंतर काढण्याचा आदेश दिल्याने सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याबाबतचा निवडणूक आयोगाने  आपला हेतू स्पष्ट केलेला नाही. 



 

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार 

अनेक वेळा सरपंच पदाचे आरक्षण अगोदर काढल्यास त्या आरक्षित जागेवरील सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेला नसतो आणि नंतर शासनाला ते आरक्षण बदलून द्यावे लागते. म्हणून कदाचित अगोदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेले आरक्षित सदस्य विचारात घेऊन सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचा हेतू निवडणूक आयोगाचा दिसतो.  पण हा निर्णय अगोदरच घेतला असता तर तो सबंध महाराष्ट्राला लागू झाला असता. आता काही जिल्ह्याची सरपंच पदाची आरक्षणे काढली गेली आणि काही जिल्ह्यांची राहिली.  ही विसंगती पुढे आली असून, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. 

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15558,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12669,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सरपंच पदाच्या आरक्षणाचा जिल्ह्यात सावळा गोंधळ
सरपंच पदाच्या आरक्षणाचा जिल्ह्यात सावळा गोंधळ
https://www.dnamarathi.com/wp-content/uploads/2020/12/Gram_panchayat-election.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_192.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_192.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content