एकाच कॉम्प्लेक्स मधील 12 दुकानांचे ना. मुंडेंच्या हस्ते उद्घाटन संपन्न परळी । प्रतिनिधीः- सिरसाळा हे छोटेसे गाव हळू हळू मोठे होत असून त्याला...
एकाच कॉम्प्लेक्स मधील 12 दुकानांचे ना. मुंडेंच्या हस्ते उद्घाटन संपन्न
परळी । प्रतिनिधीः-
सिरसाळा हे छोटेसे गाव हळू हळू मोठे होत असून त्याला शहरात रूपांतरित होताना पाहून आनंद होतो आहे, सिरसाळा येथे पंचतारांकित एमआयडीसी उभारणे हे माझे स्वप्न असून त्यासाठी भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
सिरसाळा ता. परळी येथील शिवसाई कॉम्प्लेक्स मध्ये विविध व्यवसायांच्या 12 दुकानांचे उदघाटन एका कार्यक्रमात ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्यासह आ. संजय दौंड, जि. प.गटनेते अजय मुंडे, न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट, रा.कॉ. तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुजाताई मोरे, भाई मोहन गुंड, बबनराव लोमटे, सरपंच रामराव किरवले, चंद्रकांत कराड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सिरसाळा भागात अनेक ऊस उत्पादक शेतकरी असून या भागातील शेतकर्यांनी आणखी जास्त उसाचे उत्पादन घ्यावे, त्या सर्वांचा ऊस गाळप करण्याची सोय मी एक वर्षात करणार आहे, असे सूचक विधान यावेळी बोलताना ना. मुंडे यांनी केले आहे. दरम्यान सिरसाळा येथील अतिक्रमण झालेली जागा, जायकवाडी वसाहतीची जागा, एमआयडीसी भूसंपादनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा आपण स्वतः पाठपुरावा करत असून या भागातील कोणताच प्रश्न एक वर्षापेक्षा अधिक प्रलंबित राहणार नाही, याची खबरदारी घेऊ असा शब्दही यानिमित्ताने बोलताना ना. धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना दिला.