बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात अडकली आहे. आज अखेर तिने तिर्थदीपसोबत लग्नगाठ बांधली आहे. यासंदर्भात तिने सोशल मिडीयावर लग्नाचे ...
बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात अडकली आहे. आज अखेर तिने तिर्थदीपसोबत लग्नगाठ बांधली आहे. यासंदर्भात तिने सोशल मिडीयावर लग्नाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. आज अखेर सकाळी 9.45 वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. 2 ऑक्टोबर 2020 रोजी सई व तीर्थदीप यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी सईने तिर्थदीपसाठी एक खास पोस्ट शेअर करत, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे, असं कॅप्शन दिलं होतं.त्यांनतर 29 नोव्हेंबर रोजी सई-तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं होतं. त्याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.