संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लाचखोर पोलिस कर्मचार्याच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस नाईक...
संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लाचखोर पोलिस कर्मचार्याच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस नाईक बी.बी. देशमुख असे त्या पोलिस कर्मतार्याचे नाव असून त्याला अवघी एक हजार रुपयांची लाच स्विकारतांना नाशिकच्या एलसीबीने रंगेहात पकडले. यावृत्ताने शहर पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एक किरकोळ कापड विक्रेता अजय विजय गंगावणे (वय-२२, रा.घोडेकर मळा, वेताळबाबा मंदीरसमोर,संगमनेर) यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या फिर्यादीच्या तपास कामतासंदर्भात पो.ना. देशमुख यांनी जवाब नोंदवण्यापूर्वी त्यांच्याकडे एक हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र त्यावेळी त्याच्याकडे पैसे नसल्याने सायंकाळी सदरची रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार काल सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या दुसर्या मजल्यावर संबंधित तक्रारदार व लाचखोर पोलीस कर्मचारी अशा दोघांमध्ये तडजोड झाली व त्यानुसार तक्रारदाराने त्याला एक हजार रुपये सुपूर्दही केले. त्याचक्षणी सापळा लावून बसलेल्या नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी झडप घालीत जागेवरच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानुसार कापड व्यावसायीक गंगवाल यांच्याविरोधात काल दि.१२ रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पो.ना. बी.बी. देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.