बीड । प्रतिनिधीः- व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा मौजे औरंगपुर ता. बीड येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक चंद्रसेन पडुळे यांनी आज राष्ट्रवादी क...
बीड । प्रतिनिधीः-
व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा मौजे औरंगपुर ता. बीड येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक चंद्रसेन पडुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. बीड तालुक्यातील मौजे औरंगपुर येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक चंद्रसेन पडुळे, शंकर पडुळे यांच्यासह पडुळे मित्रमंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार दि. 11 रोजी शिवछत्र येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या सोबत आपण काम करणार असून येणार्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद औरंगपुर परिसरात वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न करु असे चंद्रसेन पडुळे यावेळी म्हणाले. यावेळी सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, जेष्ठ कार्यकर्ते अशोकराव लांडे, अजय घोडके, गोरक्षनाथ घोडके, चेअरमन बंडू घोडके, नानाभाऊ लोणकर, अरुण घोडके, रामप्रसाद बोरवडे, खरात सर यांच्यासह शंकर पडुळे मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.