जालना: तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रक्तदान करीत असतो; मात्र टाळेबंदीच्या काळात अनेक महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्...
जालना: तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रक्तदान करीत असतो; मात्र टाळेबंदीच्या काळात अनेक महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्त साठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.