$type=ticker$snippet=hide$cate=0

अग्रलेख : माध्यमे तोंडघशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्याअगोदर दोन दिवस माध्यमांनी पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष होतील, अशी ...


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्याअगोदर दोन दिवस माध्यमांनी पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष होतील, अशी बातमी दिवसभर चालविली. काँग्रेस हतबल झाली आहे. तिच्याबरोबर अन्य प्रादेशिक पक्ष यायला तयार नाही. शेतकर्‍यांच्या आंदोलनातही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात पवार यांनी विरोधकांची मोट बांधली. पवार यांचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंध आहेत. त्यांना ते एकत्र आणूही शकतात; परंतु पवार यांच्या राजकीय पक्षाची ताकद फारच लहान आहे. पाच खासदार असलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होऊ शकत नाही, हे पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. देशातील अन्य प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांवर हुकमत ठेवली आहे. तसे पवार यांना महाराष्ट्रात जमलेले नाही. चारही पक्ष प्रबळ असल्याने आणि अन्य तीन पक्षांचे पवार हेच स्पर्धक असल्याने त्यांचे पाय ओढण्याचे काम कायम झाले. पवार यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना कधीच साथ मिळाली नाही. जसे पवार पंतप्रधान होऊ शकत नाहीत, तसेच त्यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षही होता येणार नाही. काँग्रेसही त्यांना कधीच संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष होऊ देणार नाही. शिवाय तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जगनमोहन रेड्डी, के. चंद्रशेखर राव, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षांची ताकद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. काँग्रेसचे पन्नासहून अधिक खासदार आहेत. काँग्रेस सातत्याने पराभवाला सामोरी जात असली, तरी ती मित्रपक्षांच्या आघाडीचे नेतृत्व पवार यांच्याकडे कधीच देणार नाही. पवार यांनाही त्याची पुरेशी कल्पना आहे. पडद्याआडून मोठेपण देणे वेगळे आणि प्रत्यक्षात विरोधकांच्या आघाडीचे अध्यक्षपद देणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. काँग्रेसने ज्या काळात काही द्यायचे, त्या काळात पवार यांना काही मिळू दिले नाही आणि नेतृत्व करण्याची वेळ आली, तर हकालपट्टी केली, हीे पवार नक्कीच विसरलेले नसतील. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतली, तर देशात विरोधकांना एकत्र आणण्यासाठी ‘पॉवरफुल’ खेळी काँग्रेस करायची शक्यताच नाही. असे असताना महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्यातील पवार यांची भूमिका लक्षात घेऊन देशात अशीच आघाडी तयार करण्यास काँग्रेस तयार असल्याची बातमी पेरण्यात आली. देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती पवार आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे े महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली. यासाठी पवार यांच्या निवासस्थानी भेट झाली. पवार हे आता केंद्रात विरोधकांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली, ती किती तकलादू आहे, हे नंतर लगेच स्पष्ट झाले. या प्रकरणी सुरूवातीच्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आल्याचे म्हटले; परंतु हे सूत्र कोण हे कधीच स्पष्ट होत नसते, तसे या वेळीही झाले. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली होती, तर काही नेत्यांनी काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणीही केली होती; परंतु राहुल यांनी यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सोनिया गांधी आता थकल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद स्वीकारायला नकार दिल्याचे माध्यमांनी नमूद केले.

 

राहुल हे संयुक्त पुरोगामी आघाडीचा चेहरा असतील; परंतु पवार यांच्या हाती अध्यक्षपदाची धुरा असेल, असे सांगण्यात आले. पवार सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, यात वाद नाही; परंतु माध्यमे त्यांना अध्यक्ष आणि पंतप्रधानही करायला तयार झाली. ही बातमी आल्यानंतर काँग्रेसच्या तारिक अन्वर यांनी असे काहीही होणार नसल्याचे सांगितले. अन्वर हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते. शेतकरी आंदोलनाच्या वेळी विरोधकांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्या वेळी राहुलदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अशावेळीही त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पवार यांनी केले, याचा संदर्भ देण्यात आला. राहुल जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद सोपवले जाणार असल्याचा तर्क लावला गेला. या बातम्या प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करू इच्छित आहे, असे तपासे यांनी म्हटले आहे. सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरलीे, अशी टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील, तसेच या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांची वर्णी लागू शकते, या चर्चेचे पवार यांनी खंडन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशा वृत्ताचे खंडन केले होते. ’पवार साहेब दिल्लीत गेले की अशा बातम्या येतात. साहेब मुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांशी सबंध आले होते. आता शेतकर्‍यांचं आंदोलन सुरू आहे. अजून तर माझ्या कानावर काही नाही. उद्या पवार साहेब यांचा वाढदिवस आहे तो शांततेत करण्याचा प्रयत्न आहे,’ असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाच्या चर्चेबाबत स्पष्ट संकेत देणे टाळले होते. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. विरोधी राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्ष एकत्र येणार असून शरद पवार याचे नेतृत्व करणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी एक्झुक्लिव्ह म्हणून चालविल्या; मात्र तारिक अन्वर, शरद पवार, नबाब मलिक, महेश तपासे यांनी स्पष्ट केल्यानंतरही माध्यमे आपलाच हेका चालवित होती. अखेर ती तोंडघशी पडली. पंजाबमधील अकाली दल देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असले, तरी सर्व पक्ष अजूनही शेतकरी कायद्याविरोधात ही एकत्र येताना दिसत नाही. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात कोणी इतका आवाज उठवला नव्हता, तेेवढा आता शेतकर्‍यांनी उठवला आहे. शेतकर्‍यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे; पण देशातील विरोधी पक्ष मात्र अजूनही चाचपडत आहे. शेतकर्‍यांच्या विषयावर शरद पवार यांच्या इतका अनुभवी नेता कोणत्याही पक्षात नाही. त्यामुळे काँग्रेस आणि सर्व प्रादेशिक पक्षांना शरद पवार एकत्र आणू शकतील का? त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या विषयावर सगळे एकत्र येतील का अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9983,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,661,देश,4154,नाशिक,776,पुणे,597,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15383,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12482,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1467,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अग्रलेख : माध्यमे तोंडघशी
अग्रलेख : माध्यमे तोंडघशी
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_217.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_217.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content