माजलगांव । प्रतिनिधीः- शेतकरी मागील दहा वर्षा पासून कोरडा किंवा ओला दुष्काळ या संकटाचा सामना करत आहे. या वर्षी माजलगांव मतदार संघात ऊस उत्पा...
माजलगांव । प्रतिनिधीः-
शेतकरी मागील दहा वर्षा पासून कोरडा किंवा ओला दुष्काळ या संकटाचा सामना करत आहे. या वर्षी माजलगांव मतदार संघात ऊस उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात वाढलेले आहेत आणि ऊस पिकाच क्षेत्र दरवर्षी पेक्षा जास्त प्रमाणात दिसून येत आहे. वादळी वार्या मुळे अनेक शेतकर्यांना ऊस पडल्या मुळे मोठा फटका बसलेला आहे. रानडुक्कर, उंदीर ऊसाला शेतात खाण्याचं प्रमाण वाढलेले आहे. अश्या अनेक संकटाचा सामना शेतकरी करत असताना ,ऊस कारखान्याला देता वेळी ऊस तोडणाराच्या पाया पडायची वेळ शेतकर्यावर येत आहे. अनेक ठिकाणी 40 आर ऊस तोडण्यासाठी 2000 ते 5000 रु पर्यंत ऊस तोड मुकादमा कडून मागणी केल्या जात आहे.म्हणजे शेतकर्यांना कुणी वाली राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.शेतकर्यांना वाटत होते पहिला हप्ता 2200 रु. प्रति टन तरी मिळेल आणि उरउरीत हप्ता पुन्हा मिळेल. यातच शेतकरी खुश झाला होता. पण कारखानदारांनी शेतकर्याच्या पदरात नैराश्य पाडलेले आहे. माजलगाव चे आमदार मा. प्रकाशदादा सोळंके यांनी प्रति टन 1600 रू. भाव देऊन शेतकर्यांना झटका दिलेला आहे, तरी सुद्धा आम्ही संभाजी ब्रिगेड च्या वतीने त्यांचा सत्कार करणार आहोत. तसेच मा. मोहनदादा जगताप यांनी 1900 रु. प्रति टन पहिला हप्ता दिलेला आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 1900 रु. भाव दिल्या मुळे शेतकर्यांना थोडा धीर मिळाला आहे पण 1900,1600 हा भाव शेतकर्यांना परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही कारखानदार यांचा सत्कार संभाजी ब्रिगेड करणार आहे आणि शेतकर्यांची अडचण,कष्ट याची जाणीव कारखानदारांना करून देऊन शेतकर्यांना कमीत कमी 2200 रु.प्रति टन ने पहिला हप्ता द्या बाकी रक्कम हमी भावा नुसार दुसर्या हप्त्यात जमा करा अन्यथा शेतकर्यांना सोबत घेऊन इतिहास कारक आंदोलन उभं करू असे आवाहन संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात येनार आहे. अशे संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष विजय दराडे यांनी म्हटले आहे.