बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या Action चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच रोहित शेट्टीचा पोलिसांवर आधारित चित्रपट ‘स...
बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या Action चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच रोहित शेट्टीचा पोलिसांवर आधारित चित्रपट ‘सूर्यवंशी’मुळे खूपच चर्चेत आला होता. आता रोहित शेट्टी आणि सलमान खान दोघे एकत्र एका चित्रपट करताना दिसणार आहेत. जर रोहित आणि सलमान एकत्र चित्रपट करणार असतील तर हा चित्रपट किती ब्लॉकबस्टर होईल यांचा अंदाज स्वतः रोहिती शेट्टीने लावला असेल.
सलमान खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले होत की, ‘मी खरंच रोहित शेट्टीसोबत चित्रपट करू इच्छित आहे आणि आम्ही दोघं एक चित्रपट करत आहोत, हे देखील खरं आहे. ही कोणतीही अफवा नाही आहे. माझं आणि रोहितचं याबाबत खूप वेळा बोलणं झालं आहे. परंतु आता काहीच निश्चित झालं नाही आहे. रोहित यावर काम करत आहे आणि एका चांगल्या स्क्रिप्टचा शोध घेत आहे. जशी ती चांगली स्क्रिप्ट आम्हाला मिळेल लगेच आम्ही चित्रपटाच्या कामाला सुरुवात करू.’
माहितीनुसार, सध्या सलमान खान आगामी ‘राधे’ चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यग्र आहे. तसंच कलर्सवरील लोकप्रिय शो बिग बॉस सीझन १४ देखील सलमान होस्ट करत आहे. तर रोहित शेट्टी आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’बाबत खूप उत्साहित आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कॅटरिना कॅफ दिसणार आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा अक्षय आणि कॅटरिनाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.