आष्टीः केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला ’भारत बंद’ पुकारण्यात आला आ...
आष्टीः केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला ’भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यात भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेससह आष्टी तालुक्यातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी या बंदला समर्थन दिलं. आष्टी, कडा, शहरातील बाजारपेठा अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. यावेळी सतिश शिंदे, आण्णा चौधरी,शिवाजी राऊत,रविंद्र ढोबळे, भाऊसाहेब लटपटे, विनोद निंबाळकर, जालिंदर वांढरे, किशोर हंबर्डे, संग्राम आजबे, डॉ. नदीम शेख, बाबासाहेब वाघुले,संदिप अस्वर, अशोक पोकळे, जालिंदर वांढरे, भाऊ, घुले, नाजिम शेख, सुरेश पवार, वसिम शेख, आदी उपस्थित होते.