ड्रोनच्या माध्यमातूनही पोलिस ठेवणार पहारा मुंबई : कोरोनामुळे सर्व सण अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. 3 ते 4 दिवसांवर थर्टी फ...
ड्रोनच्या माध्यमातूनही पोलिस ठेवणार पहारा
मुंबई : कोरोनामुळे सर्व सण अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. 3 ते 4 दिवसांवर थर्टी फस्ट आल्याने अनेकांने नियोजन केले आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा थर्टी फस्ट पार्टीचे सेलिब्रेशन देखील साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेकांनी तर घरीच थर्टी फस्टचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवले आहे. यंदा गच्चीवर थर्टी फस्टची पार्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जाणार आहे. पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जाणार आहे. यासाठी तब्बल 31 हजार पोलीस रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही सगळ्यांवर पहारा ठेवला जाणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे.