संगमनेर/प्रतिनिधी : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार यांच्या विरोधात केलेले कायदे मागे घ्यावे तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्...
संगमनेर/प्रतिनिधी : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार यांच्या विरोधात केलेले कायदे मागे घ्यावे तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या वतीने आज मंगळवार दि.८ रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. संगमनेरातील सामान्य नागरीक आणि व्यावसायीकांनी या भारत बंद आंदोलनात सामील होत शहरात शंभर टक्के बंद पाळला.