नाशिक/प्रतिनिधी : नाशिक शहर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक एअरपोर्टवरून पवीत्र हज यात्रेला जाणार्या भाविकांसाठी विमान से...
नाशिक/प्रतिनिधी : नाशिक शहर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक एअरपोर्टवरून पवीत्र हज यात्रेला जाणार्या भाविकांसाठी विमान सेवा सुरू करण्यात यावी, तसेच नाशिकमध्ये मिनी हाऊस तयार करून भाविकांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने खा. हेमंत गोडसे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
त्याचप्रमाणे नाशिक परिसरात सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले अजमेर शरीफ येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गा शरीफवर दररोज हजारो भाविक हजेरी लावतात, मात्र नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून थेट रेल्वेसेवा नसल्यामुळे भाविकांना मुंबई, मनमाड आदी ठिकाणी जाऊन प्रवास करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरून अजमेर जंक्शनला रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. खतीब-ए- नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खा. गोडसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी ॲड. कैलास खंडबहले, शेखन खतीब, जुबेर हाश्मी, फारूक पठाण, अक्रम खतीब, समीर हजारी, फारूक तांबोळी, शोएब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
------------------------------------------
प्रश्न मार्गी लावू
मुस्लिम समाजाच्या प्रश्नांच्या नक्की विचार करून केंद्र तसेच राज्य सरकारशी याबाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. यापूर्वी देखील कामे केली आहे. भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी नक्की काम होणार.
- खा.हेमंत गोडसे