$type=ticker$snippet=hide$cate=0

यूट्यूबच्या सीईओने अभिनेता कार्तिक आर्यनचे केले कौतुक!

  मुंबई : २०२० हे वर्ष प्रत्येकासाठीच खूप अवघड होते. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने  लोकांना अचूक माहिती देऊन थोडेसे हसवण्या...

 



मुंबई : २०२० हे वर्ष प्रत्येकासाठीच खूप अवघड होते. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने  लोकांना अचूक माहिती देऊन थोडेसे हसवण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात तो आपला चॅट शो कूकी पूछेगा घेऊन आला होता. ज्यामध्ये फ्रंटलाइन वर्क्सवर बोलण्याबरोबरच लोकांना हसवायचा.  

कार्तिकच्या कूकी पूछेगा शोने सोशल मीडियावर जोरदार हंगामा केला होता. हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडला होता. कार्तिक व्यतिरिक्त अनेक संगीत कलाकार लोकांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे आले होते. अशा परिस्थितीत, यूट्यूबने या लोकांच्या कार्याचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला आहे. यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वोजसिकी यांनी सोशल मीडियावर कार्तिक आर्यन यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. यूट्यूब इंडिया मधील आर्टिस्ट कंटेंट क्रिएटर, सीईओने प्रथम कार्तिक आर्यनला टॅग केले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कार्तिकने आपल्या आगामी ‘धमाका’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कार्तिक राम माधवानीच्या चित्रपटासह थ्रिलर झोनमध्ये पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलताना, कार्तिक अखेर सारा अली खान सोबत लव आज कालमध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. सध्या कार्तिकजवळ बरीच चित्रपट आहेत. भूल भूलैया 2 मध्ये कियारा अडवाणी सोबत तर दोस्ताना 2 मध्ये जाह्नवी कपूरसोबत दिसणार आहे.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनचा चित्रपट लुका छुपीने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी शानदार अशी कमाई केली होती.  लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर बनवलेला चित्रपट कॉमिक अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडलेला होता.  या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच चित्रपटाने दोन दिवसात 18 कोटी रुपये कमवले होते.

‘लुका छुपी’ने धमाकेदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी 8.01 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 10.08 कोटी रुपयांची कमाई होती. दोन दिवसात चित्रपटाने 18.09 कोटी रुपये कमवले होते. सोबतच कार्तिक आर्यनच्या करिअरमधील हा पहिला चित्रपट होता ज्याची ओपनिंग कमाई सर्वात जास्त होती. यापूर्वी 2015 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘प्यार का पंचनामा 2’ ने पहिल्या दिवशी 6.80 कोटी रुपये कमावले होते. तसेच 2018 मध्ये आलेला चित्रपट ‘सोनू की टीटू की स्वीटी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.42 कोटी रुपये कमवले होते. असे तीन चित्रपटात आतापर्यंत कार्तिक आर्यनने प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5573,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10029,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,619,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15511,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12620,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3472,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3168,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: यूट्यूबच्या सीईओने अभिनेता कार्तिक आर्यनचे केले कौतुक!
यूट्यूबच्या सीईओने अभिनेता कार्तिक आर्यनचे केले कौतुक!
https://static.langimg.com/thumb/msid-64338457,imgsize-52764,width-540,height-405,resizemode-75/navbharat-times.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_253.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_253.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content