कोल्हापूर / प्रतिनिधी : प्लास्टर ऑफ पॅरिस वर घालण्यात आलेली बंदी तात्काळ हटवावी, यासह इतर मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी...
कोल्हापूर / प्रतिनिधी : प्लास्टर ऑफ पॅरिस वर घालण्यात आलेली बंदी तात्काळ हटवावी, यासह इतर मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ’मी मूर्तिकार’ अशा टोप्या परिधान करून हजारो मुर्तीकर व त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. एक कुंभार, लाख कुंभार अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. मोर्चामध्ये सहभागी केलेली भव्य गणेशमूर्ती मोर्चाचे लक्ष वेधून घेत होती.
मोर्चामध्ये कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश व कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीद्वारा श्री संत गोरा कुंभार मुर्तिकार संघ, कोल्हापूर यांच्यावतीने विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये पीओपीवरील बंदी हटवावी, महाराष्ट्र शासनाने कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, ( पान 1 वरुन) संत गोरोबा काका यांचे जन्मस्थान तेर ढोकी जिल्हा उस्मानाबाद या क्षेत्रास अ दर्जा द्यावा, कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे.
मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी पूर्णपणे माफ करावी. माती वाहतूक व वीटभट्टी परवान्याच्या जाचक अटी रद्द कराव्यात. कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना मिळावा. कुंभार समाजासाठी राखीव असणार्या कुंभारखाणीवरील अतिक्रमणे दूर करावीत व खाजगी खाणीतून ही माती काढण्यास मान्यता मिळावी. कुंभार समाजासाठी मूर्ती मडकी विक्रीसाठी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका हद्दीत अग्रक्रमाने जागा उपलब्ध करून द्यावी. कुंभार समाजाला आपल्या मालाच्या उत्पादनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी. कुंभार समाजातील 60 वर्षावरील कारागीर अस मानधन मिळावे विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तर व स्वतंत्र वसती घर मिळावे आशा मागण्या करण्यात आल्या.