नाशिक : कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील जवानाला वीरमरण आले आहे. शुक्रवारी (दि.११) रात्री ९ वाजे...
नाशिक : कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील जवानाला वीरमरण आले आहे. शुक्रवारी (दि.११) रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून सुरेश घुगे असे शहीद जवानाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जम्मु येथे रात्री नऊच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील जवान सुरेश घुगे कर्तव्य बजावत होते. याच वेळी त्यांचा पाय घसरून डोंगरावरून कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता.
खराब हवामानामुळे विमानाने त्यांचे पार्थिव आणतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत अधिकृतपणे निर्णय तेथील लष्करी अधिकारी घेणार असून लवकरच याबाबतची माहिती समोर येईल.
घुगे यांच्या नातेवाईकांना पहाटे दूरध्वनीवरुन माहिती कळविण्यात आली. या घटनेची वार्ता सोशल मीडियात व्हायरल झाल्यानतर सर्व स्तरांतून जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली असल्याने त्यांना तत्काळ लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्यांचे या घटनेत निधन झाले. घुगे 2006 साली सेनेत दाखल झाले होते. मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. सध्या जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये कार्यरत होते.एका वर्षात होणार निवृत्त होते.
त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि 9 वर्षाची मुलगी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
"नांदगाव तालुक्यातील अस्तगावचे सुपुत्र सुरेश घुगे हे जम्मू काश्मिरच्या सिमेवर कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले. अत्यंत दु:ख झाले. सुरेश घुगे यांना जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये कर्तव्य बजावत असतांना डोंगरावरून पडून झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून त्यांनी शिक्षण घेऊन कठीण परिश्रम घेत ते सन २००६ साली लष्करात भरती झाले होते. त्यांच्या निधनाने भारत मातेने वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबिय घुगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून राज्य शासनाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो."
- छगन भुजबळ
पालकमंत्री, नाशिक