$type=ticker$snippet=hide$cate=0

बुलडाण्यात आझाद हिंद शेतकरी संघटना किसान ब्रिगेडचे धरणे निषेध सभा आंदोलन..

देशात अराजकता निर्माण झाल्यास केंद्रातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही : अँड.सतीशचंद्र रोठे.. बुलडाना (प्रतिनिधि) केंद्र सरकारच्या ...



देशात अराजकता निर्माण झाल्यास केंद्रातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही : अँड.सतीशचंद्र रोठे..


बुलडाना (प्रतिनिधि)

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी  कायद्यांमुळे देशातील शेतकरी महाक्रांतीच्या दिशेने निघालेला आहे. केंद्र सरकारने त्वरित शेतकरी विरोधी कायदे रद्द न केल्यास देशात अराजकता निर्माण होऊन केंद्रातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही असे मत अँड.सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड, किसान सभा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ८ डिसेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी रोठे बोलत होते. 

शेतकरीविरोधी  कायदे रद्द करण्यासाठी  देशातील शेतकरी एकवटला असून  केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरण आता  सर्वश्रुत झाले आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार्‍या सरकारचे मनसुबे उधळून लावण्यासाठी  किसान ब्रिगेड  रस्त्यावर उतरेल असे मत किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी यावेळी व्यक्त केले.

 किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष  अविनाश काकडे, किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरूषोत्तम गावंडे यांची या आंदोलनात विशेष उपस्थिती होती. 

शेतक-यांची मते मागतांना शेतकरी आठवतो आणि कामे मात्र भांडवलदारांची केली जाते. त्यामुळे मोदी सरकार हे भांडवलदारधार्जीणी असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते दत्ताभाऊ भुतेकर यांनी केला. देशात सध्या शेतक-यांचे शोषण सुरु आहे. त्याला कायदेशीर मान्यता देण्याचे काम सरकार करीत आहे. या सरकारविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे काम ताकदीने केले पाहिजे,असे किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे यावेळी म्हणाले. भारत सरकारने आणलेल्या ३ कृषी विषयक कायद्यांचा निषेध, तसेच हे कायदे सरकारे तात्काळ परत घ्यावे यासाठी किसान ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे १२ ते ५ या वेळात धरणे देत निषेध सभा घेण्यात आली. शेतकरी नेते प्रकाश पोहरे,  अविनाश काकडे, पुरूषोत्तम गावंडे, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अ‍ॅड.सतिशचंद्र रोठे,  वकील संघाचे अध्यक्ष अँड.विजय सावळे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संजय हाडे, अनिल जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुमीत सरदार, जफर शेख,निलेश तायडे, अकिल शहा ,अस्लम शहा, संजय एंडोले, नामदेवराव डोंगरदिवे, भारिपचे विनोद जवंजाळ ,निलेश तायडे,  यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.


पंजाबला कृषी पारतंत्र्याची चाहूल..

स्वातंत्र्यकाळात सर्व प्रथम उठाव करणा-या १२१ लोकांना इंग्रजांनी फाशी दिली त्यात पंजाब चे ९० जण शहीद झाले होते. त्या वेळी देशात पंजाब आघाडीवर होता.आताही आहे. सर्वात आधी कृषीक्षेत्रातील  पारतंत्र्याची चाहूल पंजाब ओळखून आहे. मात्र मोदी सरकार विभाजनवादी असून जगात खोटं बोलण्यात प्रधानमंत्र्याचा हात कोणी धरू शकणार नाही, असे विचार  किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश काकडे यांनी यावेळी व्यक्त केले. 

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15558,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12669,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बुलडाण्यात आझाद हिंद शेतकरी संघटना किसान ब्रिगेडचे धरणे निषेध सभा आंदोलन..
बुलडाण्यात आझाद हिंद शेतकरी संघटना किसान ब्रिगेडचे धरणे निषेध सभा आंदोलन..
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_263.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_263.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content