३ लाख १६ हजार रुपयांचा दंड; वाळू माफियांविरोधात पारनेर मध्ये धाडशी कारवाई ! पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यामध्ये वाळुउपसा करणार्या वाहना...
३ लाख १६ हजार रुपयांचा दंड; वाळू माफियांविरोधात पारनेर मध्ये धाडशी कारवाई !
पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यामध्ये वाळुउपसा करणार्या वाहनांवर तहसिलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेण्यात आला असून त्यावर ३ लाख १६५०८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील टेकुडवस्ती ता. पारनेर येथे मध्यरात्री १.३० च्या सुमारास तहसीलदार ज्योती देवरे यांनी छापा टाकला. यावेळी अवैधरित्या वाळू वाहतूक करत असताना एक हायवा तहसीलदार देवरे यांच्या पथकाने ताब्यात घेतला या पथकात दत्ता गांधाडे, दिगंबर पवार यांचा समावेश होता. दि २१ रोजी मध्यरात्री १:३० सुमारास ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली डंपरमध्ये ४ ब्रास वाळू असल्याचे निष्पन्न झाले. हा हायवा राजू डोंगरे यांच्या मालकीचा असून तो तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने मध्यरात्री ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात मध्ये आणून लावला आहे. त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यामध्ये अवैधरित्या वाळू वाहतुकीचा प्रकार अनेक वेळा उघड झाला आहे. वेळोवेळी तहसिल पथकाने अनेक भागांमध्ये छापा टाकला आहे. यामध्ये अशा प्रकारचे वाहने ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे कामकाज तहसिल विभागातून केले आहे. तरीही वाळूमाफियाचा तालुक्यामध्ये सुळसुळाट झालेला दिसून येत आहे. अशा प्रकारचे अनेक डंपर अनधिकृतपणे वाळू वाहतूक करताना आढळून येत आहे. यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ढवळपुरी परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती वेळोवेळी तहसिल कार्यालयामध्ये मिळत आहे. त्यामाध्यमातून अशा प्रकारच्या कारवाया प्रशासनाकडून केल्या जात आहेत. तरीही वाळूमाफिया अधिकाऱ्यांची नजर चुकून अशा प्रकारचे कृत्य करत आहेत. त्यावर प्रशासन कडक पावले उचलून कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
वाळू माफियांविरोधात तहसीलदार ज्योती देवरे यांनी अनेक वेळा धाडसी कारवाई केल्या आहेत. त्याचप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही कारवाई केली यामध्ये वाळू माफियांना चाहूल लागून देता त्यांनी ही कारवाई केली. त्यानंतर डंपर ताब्यात घेण्यात आला व स्वतः डंपरमध्ये बसून तो तहसील कार्यालयामध्ये आणून लावण्यात आला.